सुप्रसिद्ध Kinetic ची Luna Electric Moped येतेय; 50 हजाराच्या आत किंमत, रेंज किती?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2021 09:38 AM2021-08-22T09:38:15+5:302021-08-22T09:38:59+5:30

Kinetic Luna Electric Moped Launch Price Features: 70-80 च्या दशकात जेव्हा टू व्हीलर लोकांपर्यंत पोहोचविणे सोपे नव्हते तेव्हा सामान्यांसाठी Kinetic Luna ही सायकल कम स्कूटरचाच पर्याय होता.

Kinetic Luna Electric Moped to Launch This Year, 50000 rs price, 80 Kms Range Expected | सुप्रसिद्ध Kinetic ची Luna Electric Moped येतेय; 50 हजाराच्या आत किंमत, रेंज किती?

सुप्रसिद्ध Kinetic ची Luna Electric Moped येतेय; 50 हजाराच्या आत किंमत, रेंज किती?

googlenewsNext

Kinetic Luna Electric Moped Launch Price Features: भारतात ईलेक्ट्रीक वाहनांचा बाजार आता फुलू लागला आहे. रोज कोणती ना कोणती कंपनी, स्टार्टअप इलेक्ट्रीक व्हेईकल लाँच किंवा त्याची अपडेट पसरवत आहे. ओला, सिंपल, होंडा, हिरोनंतर आता एकेकाळी तुमची आमची सर्वांची अशी वाटलेली कायनेटीक (Kinetic) कंपनी एक चांगली खबर घेऊन आली आहे. (Kinetic Luna Electric Moped Likely Launch In India This Year.)

Electric Scooters च्या बाजारात आता कायनेटीक एन्ट्री करणार आहे. Kinetic Luna Moped आता इलेक्ट्रीकमध्ये येत आहे. लवकरच ही कायनेटीक लुना इलेक्ट्रीक मोपेड (Kinetic Luna Electric Moped) भारतीय बाजारात लाँच केली जाणार आहे. या स्कूटरची किंमत आवाक्यात आणि बॅटरी रेंजदेखील चांगली असणार आहे. 

कायनेटीक एनर्जी
70-80 च्या दशकात जेव्हा टू व्हीलर लोकांपर्यंत पोहोचविणे सोपे नव्हते तेव्हा सामान्यांसाठी Kinetic Luna ही सायकल कम स्कूटरचाच पर्याय होता. 50 सीसीच्या या मोपेडला सायकल सारखे पॅडल होते. नंतर इतर कंपन्यांच्या स्कूटर आणि कायनेटीकची स्कूटर येऊ लागताच ही मोपेड बंद झाली होती. आता पुन्हा ही मोपेड नव्या रुपात येत आहे. 

या Kinetic Luna Electric Moped मध्ये 1kW ताकद निर्माण करण्यासाठी Lithium-ion बॅटरी पॅक असेल जी सिंगल चार्जमध्ये 70-80 km ची रेंज देईल. या मोपेडचा सर्वाधित वेग हा 25 किमी प्रति तास असू शकतो. तसेच या मोपेडची किंमत 50000 रुपयांच्या आत असू शकते. यामुळे ग्रामीण भागात, निमशहरी भागात ही स्कूटर वापरता येईल. तसेच परवडणारी देखील असेल.  इलेक्ट्रिक सेल्फ स्टार्ट, एलईडी हेडलाइट्स, डीआरएल, डिजिटल इंस्ट्रूमेंट कंसोल, युएसबी चार्जसह अनेक फिचर्स असू शकतात.

Web Title: Kinetic Luna Electric Moped to Launch This Year, 50000 rs price, 80 Kms Range Expected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.