लाँग ड्राइव्हसाठी कॅप्टन सीट असलेल्या ‘स्वस्त’ कार; मारुती, ह्युदाई, किआ कंपन्यांचा समावेश

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2022 10:29 AM2022-12-25T10:29:00+5:302022-12-25T10:30:36+5:30

सर्वांत कमी किमतीत कॅप्टन सीटसह येणाऱ्या काही गाड्यांबाबत जाणून घेऊया...  

know about cheap cars with captain seats for long drives including maruti hyundai kia companies | लाँग ड्राइव्हसाठी कॅप्टन सीट असलेल्या ‘स्वस्त’ कार; मारुती, ह्युदाई, किआ कंपन्यांचा समावेश

लाँग ड्राइव्हसाठी कॅप्टन सीट असलेल्या ‘स्वस्त’ कार; मारुती, ह्युदाई, किआ कंपन्यांचा समावेश

googlenewsNext

कारने नेहमी लांब पल्ल्याचा प्रवास करणारे लोक बेंच सीटच्या तुलनेत आरामदायी कॅप्टन सीट असलेल्या गाड्यांना प्राधान्य देतात. सर्वांत कमी किमतीत कॅप्टन सीटसह येणाऱ्या काही गाड्यांबाबत जाणून घेऊया... 

मारुती सुझुकी एक्सएल ६ - ‘झेटा’पासून पुढे

ही भारतातील सर्वांत कमी किमतीतील कार आहे. जी ६-सीट कॉन्फिगरेशन आणि मधल्या रांगेत कॅप्टन सीटसह येते.
एक्स-शोरूम किंमत 
₹११.२९ लाख रुपयांपासून   

ह्युंडाई अल्कझार - ‘प्रेस्टीज एक्झिक्युटिव्ह’पासून पुढे

एसयूव्ही ६ आणि ७ दोन्ही सीटच्या पर्यायात येते; पण, डिझेल इंजिनसह ६ सीटर प्रेस्टिज एक्झिक्युटिव्ह प्रकाराची किंमत सर्वांत कमी आहे.   
एक्स-शोरूम किंमत  
₹१६.३० लाख रुपयांपासून   

किया कॅरेन्स - ‘लक्झरी प्लस’पासून 
 
गेल्या वर्षीच लाँच झालेल्या या एमपीव्हीच्या लक्झरी प्लस व्हेरिएंटपासून कॅप्टन सीट मिळतात. दुसऱ्या रांगेत कॅप्टन सीट असलेल्या लक्झरी प्लसमध्ये १.४ लीटर टर्बो पेट्रोल किंवा १.५ लीटर डीझेल अशा दोन्ही इंजिनचा पर्याय मिळतो.   
एक्स-शोरूम किंमत  
₹१६.७५ लाख रुपयांपासून 
  
एमजी हेक्टर - प्लस - ‘सुपर’पासून 

एमजी हेक्टर प्लस मुळात हेक्टर एसयूव्हीची ३-रो सीट असलेली आवृत्ती आहे. ही ६ आणि ७ अशा दोन्ही प्रकारात कॅप्टन सीटसह येते. कॅप्टन सीटसह सर्वांत कमी किंमत ६ सीट असलेल्या ‘सुपर’ व्हेरिअंटची आहे. 
एक्स-शोरूम किंमत  
₹१७.७३ लाख रुपयांपासून

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: know about cheap cars with captain seats for long drives including maruti hyundai kia companies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Automobileवाहन