Bajaj Avenger Street 160: केवळ ४५ हजारांत तुमची होऊ शकते 'ही' क्रुझर बाईक; पाहा ऑफरपासून मायलेजपर्यंत डिटेल्स
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2022 03:18 PM2022-03-08T15:18:50+5:302022-03-08T15:20:21+5:30
क्रुझर सेगमेंटच्या बाइक्स आवडणाऱ्या लोकांची संख्या खूप जास्त आहे.
Bajaj Avenger Street 160: क्रूझर बाईक सेगमेंट हा टू व्हीलर मधला तो सेगमेंट आहे ज्यामध्ये निवडक बाइक्स आहेत. पण या सेगमेंटच्या बाइक्स आवडणाऱ्या लोकांची संख्या खूप जास्त आहे. क्रूझर बाइक सेगमेंटमध्ये उपस्थित असलेल्या सर्व बाइक्सपैकी, आज आम्ही बजाज एव्हेंजर स्ट्रीट 160 बद्दल बोलत आहोत, जी त्याच्या कंपनीसह या सेगमेंटची लोकप्रिय बाइक आहे.
बजाज एव्हेंजरची एक्स शोरुम किंमत 1,08,902 रुपये इतकी आहे आणि त्याची ऑनरोड किंमत 1,29,283 रुपये आहे. परंतु आपण त्या ऑफर्सबद्दल जाणून घेऊ ज्यामध्ये ही बाईक तुम्हाला अगदी अर्ध्या किंमतीत मिळेल. तुम्हाला ऑनलाइन सेकंडहँक बाईक्सची विक्री करणाऱ्या कंपन्या माहितच असतील. BIKEWALE या वेबसाईटवर बजाज एव्हेंजरचं 2013 चं मॉडेल विक्रीसाठी पोस्ट करण्यात आलंय. यामध्ये याची किंमत 30000 रुपये निश्चित करण्यात आलीये. परंतु यासोबत कोणतीही ऑफर देण्यात आलेली नाही.
याशिवाय DROOM या वेबसाईटवर बजाज एव्हेंजरचं 2017 चं मॉडेल विक्रीसाठी उपलब्ध आहे. त्याची किंमत 45000 रुपये निश्चित करण्यात आलीये. यासोबतच काही फायनॅन्स प्लॅन्सही देण्यात आले आहेत. BIKEDEKHO या वेबसाईटवर बजाज एव्हेंजरचं 2016 चं मॉडेल लिस्ट करण्यात आलंय. याची किंमत 45000 रुपये ठेवण्यात आलीये. परंतु यासोबतही कोणतीही ऑफर नाही.
काय आहे खास?
बजाज एव्हेंजर स्ट्रीट 160 च्या इंजिन आणि पॉवर बाबत सांगायचं झालं तर यात 160 सीसी सिंगल सिलिंडर इंजिन देण्यात आलं आहे. हे इंजिन 15Ps चं पॉवर आणि 13.7 Nm चं टॉर्क जनरेट करतं. बाईकच्या ब्रेकिंग सिस्टमबद्दल सांगायचं झालं तर याच्या फ्रन्टला डिस्क ब्रेक आणि रिअर ड्रम ब्रेक देण्यात आलाय. ही बाईक 47.2 किमी प्रति लिटरचं मायलेज देत असल्याचा दावा कंपनीनं केलाय.
(टीप : कोणत्याही प्रकारची गाडी खरेदी करण्यापूर्वी ती तपासून घ्यावी. हे आर्टिकल केवळ सुविधेसाठी देण्यात आलं आहे.)