हे आहे Nexon SUV चं सर्वात स्वस्त मॉडेल, हॅचबॅक एवढीच आहे किंमत
By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2022 01:18 PM2022-07-23T13:18:23+5:302022-07-23T13:19:24+5:30
या एसयूव्हीच्या टॉप मॉडेलची किंमत 11,99,000 रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) एवढी आहे...
दमदार पॉवर आणि जबरदस्त डिझाइनमुळे भारतीय बाजारात Tata Nexon एसयूव्हीला मोठी पसंती आहे. खरे तर सुरक्षिततेच्या दृष्टीने या एसयूव्हीला तोड नाही. या कारमध्ये जबरदस्त स्पेस मिळतो. याशिवाय यात हायटेक आणि यूजर्स सेंट्रिक फीचर्स देखील आहेत. या एसयूव्हीच्या टॉप मॉडेलची किंमत 11,99,000 रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) एवढी आहे. यामुळे ती अनेक वेळा लोकांच्या बजेटमध्ये फिट बसत नाही. पण जर आपण ही खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर आज आम्ही आपल्याला हिच्या सर्वात किफायतशीर आणि दमदार मॉडेलबद्दल सांगणार आहोत.
कोणते आहे हे मॉडेल -
Nexon सब-कॉम्पॅक्ट एसयूव्हीच्या टॉप मॉडेलसंदर्भात बोलायचे झाल्यास, या मॉडेलचे नाव आहे Nexon XZPlus (P) Dark. या मॉडेली किंमत 11,99,000 रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) एवढी आहे. मात्र, आपले बजेट यापेक्षा कमी अथवा 8 लाखपेक्षा कमी असेल, तर आपण याचे बेस मॉडेल घेण्यासंदर्भात विचार करू शकता. खरे तर याचे बेस मॉडेल Tata Nexon XE ची किंमत 7,59,900 रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) एवढी आहे. हे सर्वात खालच्या क्रमांकाचे मॉडेल आहे. याची किंमत कमी असण्याबरोबरच यातील फीचर्सदेखील इतर मॉडेलच्या तुलनेत बरेच कमी आहेत. जर आपल्याला अधिक फीचर्सची आवश्यकता नसेल, तर आपण ही बेसिक फीचर्स असलेली कार खरेदी करू शकतात.
स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स -
टाटा नेक्सॉनमध्ये 1.2L चे 3 सिलेंडर Revotron Turbocharged पेट्रोल इंजिन मिळेल. जे 5500rpm वर 118.36bhp ची मॅक्सिमम पॉवर आणि 1750-4000rpm वर 170Nm चा पीक टॉर्क जनरेट करेल. मायलेजसंदर्भात बोलायचे झाल्यास ही एसयूव्ही जवळपास 21.5 kmpl एवढे मायलेज ऑफर करते. जे पेट्रोल मॉडलसाठी आहे. नेक्सॉनच्या बेस मॉडेलमध्ये ग्राहकांना जबरदस्त बूट स्पेस मिळतो, याच बरोबर या एसयूव्हीची सेफ्टी रेटिंगही जबरदस्त आहे. ही एक फुल पॅकेज किफायतशीर एसयूव्ही आहे.