आता Honda Activa विसरा! या स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर देतात चांगली रेंज, किंमत फक्त 45 हजारपासून सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2022 12:44 PM2022-12-23T12:44:58+5:302022-12-23T12:47:40+5:30
इलेक्ट्रिक स्कूटर्सचा विचार केल्यास, बाजारात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर्सदेखील उपलब्ध आहेत. ज्याणून घेऊयात त्या संदर्भात...
देशात इलेक्ट्रिक वाहनांची बाजारपेठ सातत्याने वाढताना दिसत आहे. अनेक नवीन इलेक्ट्रिक वाहने बाजारात येत आहेत. लोकांमध्ये या वाहनांची स्वीकारार्हताही वाढताना दिसत आहे. परिणामी अलीकडच्या काळात इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीत तेजी दिसून आली आहे. सध्या इलेक्ट्रिक वाहने खूप महाग आहेत. मात्र याचा अर्थ, स्वस्त इलेक्ट्रिक वाहनेच बाजारात नाहीत, असा अजिबात नाहीत. इलेक्ट्रिक स्कूटर्सचा विचार केल्यास, बाजारात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर्सदेखील उपलब्ध आहेत. ज्याणून घेऊयात त्या संदर्भात...
Avon E Scoot -
Avon E Scoot ची किंमत सुमारे 45,000 रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) एवढी आहे. कंपनीचा दावा आहे की ही स्कूटर 65 किमीची रेंज देते. हिची टॉप स्पीड 24KMPH एढी आहे. स्कूटरला 215W BLDC मोटर आणि 48V/20AH बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी पूर्णपणे चार्ज होण्यासाठी 6 ते 8 तास लागतात.
Bounce Infinity E1 -
हिची किंमत 45,099 रुपये (बॅटरी नसलेले व्हेरिअंट) सुरू होते. तसेच बॅटरी पॅक असलेल्या व्हेरिअंटची किंमत 68,999 रुपये एवढी आहे. हिला 2kWh/48V बॅटरी देण्यात आली आहे. हिची टॉप स्पीड 65kmph तर रेंज- 85km असल्याचा दावा कंपनीने केला आहे.
Hero Electric Optima CX -
हिची किंमत (सिंगल बॅटरी व्हेरिअंट) 62,190 रुपये आहे. या स्कूटरची टॉप स्पीड- 45 KM/H तर रेंद 82KM एवढी आहे. यात तीन कलर ऑप्शन्स देण्यात आले आहे. हिच्यासोबत 51.2V/30Ah बॅटरी येते. जी 4 ते 5 तासांत पूर्णपणे चार्ज होऊ शखते, असा दावा कंपनीने केला आहे.
Ampere Magnus EX -
हिच्यासोबत LCD स्क्रीन, इंटीग्रेटेड USB पोर्ट, कीलेस एंट्री आणि अँटी-थेफ्ट अलार्म देण्यात आला आहे. ही स्कूटर 1.2 kW मोटरसह उपलब्ध आहे. हिची टॉप स्पीड ताशी 55 किमी एवढी आहे. या स्कूटरसोबत 60V, 30Ah बॅटरी येते, जी 121 किलोमीटरची रेंज देऊ शकते, हिची किंमत 73,999 रुपये आहे.