सर्वांत सुरक्षित एसयूव्ही कोणती? ‘या’ कारना मिळालेत ५ स्टार्स रेटिंग

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2022 11:40 AM2022-12-25T11:40:04+5:302022-12-25T11:41:22+5:30

‘ग्लोबल एनसीएपी’या संस्थेने २०२२ मधील अनेक कारना सुरक्षा रेटिंग दिले आहे.

know about which is the safest suv these cars has got 5 stars rating | सर्वांत सुरक्षित एसयूव्ही कोणती? ‘या’ कारना मिळालेत ५ स्टार्स रेटिंग

सर्वांत सुरक्षित एसयूव्ही कोणती? ‘या’ कारना मिळालेत ५ स्टार्स रेटिंग

googlenewsNext

नवी दिल्ली : गाडी खरेदी करताना अनेक गोष्टींचा विचार केला जातो. गाडीच्या किमतीबरोबरच सुरक्षाही महत्त्वाची असते. एसयूव्ही श्रेणीतील गाड्यांच्या बाबतीत तर सुरक्षा अधिक महत्त्वाची असते. कारण या गाड्या लांबच्या प्रवासासाठी वापरल्या जातात. नव्या वर्षात अनेकांनी एसयूव्ही गाडी खरेदीचा विचार केलाही असेल. त्यापूर्वी या गाड्यांच्या सुरक्षेचा आढावा घ्या.  ‘ग्लोबल एनसीएपी’या संस्थेने २०२२ मधील अनेक गाड्यांना सुरक्षा रेटिंग दिले आहे. या गाड्यांना या यादीत पहिल्या पाचमध्ये स्थान मिळाले आहे.

स्कोडा कुशाक/ फॉक्सवॅगन टायगन: या दोन्ही गाड्यांना ‘जीएनसीएपी’ने सुरक्षेच्या बाबतीत सर्वोच्च मानांकन दिले आहे. प्रौढ आणि बाल अशा दोन्ही प्रवाशांच्या बाबतीत या गाड्यांना ५ स्टार मानांकन आहे. 

महिंद्रा एक्सयूव्ही ७००: ‘ग्लोबल एनसीएपी’च्या सर्वाधिक सुरक्षित एसयूव्हीच्या टॉप-५ यादीतील महिंद्राची तिसरी गाडी आहे. प्रौढ प्रवाशांच्या सुरक्षेबाबत गाडीला ५ स्टार मिळाले आहेत. मुलांच्या सुरक्षेबाबत गाडीला ४ स्टार मिळाले आहेत.

महिंद्रा स्कॉर्पिओ-एन: या गाडीला भारतीय रस्त्यांच्या दृष्टीने सर्वाधिक सुरक्षित एसयूव्हीचा दर्जा ‘जीएनसीएपी’ने दिला आहे. या गाडीला प्रौढ प्रवाशांच्या सुरक्षेच्याबाबतीत ५ स्टार मिळाले आहेत. मुलांच्या सुरक्षेबाबत मात्र गाडीला ३ स्टार आहेत.

टाटा पंच: या गाडीला प्रौढ प्रवाशांच्या सुरक्षेसाठी ५ स्टार; तर मुलांच्या सुरक्षेसाठी ४ स्टार दिले गेले आहेत. 

महिंद्रा एक्सयूव्ही ३००: या गाडीला ‘जीएनसीएपी’ने प्रौढ प्रवाशांच्या सुरक्षेसाठी ५ स्टार; तर मुलांच्या सुरक्षेसाठी ४ स्टार दिले आहेत. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: know about which is the safest suv these cars has got 5 stars rating

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Automobileवाहन