92 वर्षांची झाली Mercedes-Benz कंपनी, जाणून घ्या काही रोमांचक गोष्टी!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2018 04:21 PM2018-06-29T16:21:07+5:302018-06-29T16:21:22+5:30
Mercedes-Benz चा जन्म 28 जून 1926 मध्ये झाला होता. या ब्रॅन्डने आता 92 वर्ष पूर्ण केले आहेत. चला एक नजर मारुयात Mercedes-Benz या ब्रॅंन्डच्या 92 वर्षांच्या प्रवासावर....
लक्झरी कारचा जेव्हाही विषय निघेल तेव्हा Mercedes-Benz ब्रॅन्डचा उल्लेख नक्कीच होईल. जगातल्या प्रिमिअम ऑटोमोबाईल ब्रॅंड्सपैकी असलेल्या Mercedes-Benz चा जन्म 28 जून 1926 मध्ये झाला होता. या ब्रॅन्डने आता 92 वर्ष पूर्ण केले आहेत. चला एक नजर मारुयात Mercedes-Benz या ब्रॅंन्डच्या 92 वर्षांच्या प्रवासावर....
घड्याळ बनवणाऱ्या कंपनीसोबत तयार केली SmartFortwo कार
Mercedes-Benz ने स्वित्झर्लंडच्या एका घड्याळ तयार करणाऱ्या स्वॅच कंपनीसोबत मिळून SmartFortwo ही कार तयार केली. ही कार 1998 मध्ये पहिल्यांदा जगासमोर आणलं गेलं. ही जगातल्या त्या निवडक कार्सपैकी एक आहे जी कार जस्टिन बिबरही चालवतो.
अॅडॉल्फ हिटलरसाठीही तयार केली कार
Mercedes-Benz ने दुसऱ्या महायुद्धावेळी केवळ अॅडॉल्फ हिटलरसाठी कारच तयार केली नाहीतर या कंपनीने जर्मनासाठी शस्त्रास्त्रही तयार केले. एअरक्राफ्ट आणि सबमरीनही तयार केले.
कार्ल बेंजने जगाला पहिलं इंटरनल कंबशन इंजिन दिलं
ऑटोमोटिव्ह आणि इंजिन डिझाईनचे जनक कार्ल बेंज यांनी जगाला पहिलं इंटरनल कंबशन असलेलं इंजिन दिलं. हे इंजिन त्यांनी 1886 मध्ये बेंज पेटेंट मोटरवॅगनच्या नावाने पेटेटं केलं गेलं. कार्ल यांनाच जगातलं पहिलं ड्रायव्हिंग लायसन्स मिळालं होतं.
Daimler मध्ये एक डायरेक्टर रेसिंगचे शौकीन
(Image Credit: www.motorsportmagazine.com)
Daimler मध्ये एका डायरेक्टर होते जे रेसिंगचे फार शौकीन होते. त्यांनी ट्रेड सेटिंग Mercedes 35hp रेस कार तयार केली होती. त्यांनी या कारला 1901 मध्ये आपल्या मुलीच्या नावावरुन दिलं होते. नंतर हेच नाव ब्रॅन्ड बनलं.
Daimler आणि Benz 1924 पर्यंत वेगळे होते
Daimler आणि Benz 1924 पर्यंत वेगळे होते. नंतर दोघे एकत्र आले आणि त्यांनी सोबत ऑटोमोबाईल्स आणि इंजिन तयार केलेत. त्यानंतर 1926 मध्ये Daimler-Benz यांच्याकडून तयार करण्यात आलेल्या वाहनांना Mercedes-Benz अशी ओळख मिळाली.
1999 मध्ये मर्जरआधी एएमजी एक स्वायत्त कंपनी
1999 मध्ये मर्ज होण्याआधी एएमजी एक स्वायत्त कंपनी होती. ही कंपनी नंतर Daimler-Benz साठी स्पेशल परफॉर्मंन्स तंत्रासाठी काम करत होती. एकत्र आल्यानंतर मर्सिडीजने एफ1 वॉरिअर तयार केले.
मर्सिडीजचा आयकॉन लोगो
मर्सिडीजचा आयकॉन लोगो पाणी, जमिन आणि हवेतील मोबिलिटी(गतिशीलता) दर्शवतो. हा लोगो 1910 मध्ये तयार करण्यात आला. पाणी आणि हवा यासाठी कारण मर्सिडीज बेंजने सबमरीन आणि एअरक्राफ्टसाठी इंजिन तयार केले.