Komaki आपल्या Electric Scooters मध्ये वापरणार जबरदस्त बॅटरी; एका चार्जमध्ये जाणार २२० किमी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2021 04:46 PM2021-05-03T16:46:47+5:302021-05-03T16:50:11+5:30

Electric Scooters : चार दिवसांतून एकदा करावी लागणार बॅटरी चार्ज

Komaki develops new Li ion battery with 220km range To debut in these electric scooters | Komaki आपल्या Electric Scooters मध्ये वापरणार जबरदस्त बॅटरी; एका चार्जमध्ये जाणार २२० किमी

Komaki आपल्या Electric Scooters मध्ये वापरणार जबरदस्त बॅटरी; एका चार्जमध्ये जाणार २२० किमी

Next
ठळक मुद्देचार दिवसांतून एकदा करावी लागणार बॅटरी चार्जबॅटरीसह मिळणार तीन वर्षांची वॉरंटी

देशातील आघाडीच्या इलेक्ट्रिक दुचाकी वाहन उत्पादक कंपनी Komaki नं अलीकडेच बाजारात आपल्या दुचाकी वाहनांचे मॉडेल बाजारात आणले. आता कंपनी विशेष Li-ion बॅटरी तंत्रज्ञानावर काम करत आहे. पेटंटच्या कारणांमुळे अद्याप या तंत्रज्ञानाविषयी फारशी माहिती देण्यात आलेली नाही. परंतु कंपनीनं दिलेल्या माहितीनुसार ही बॅटरी इन हाऊस तयार केली जाणार आहे.

एक्स्प्रेस ड्राईव्हजमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार कंपनी या बॅटरीमध्ये वापरलेला शेल कोरियाकडून आयात करेल आणि तो येथे असेंबल केला जाईल. ही बॅटरी वजनात अगदी हलकी असेल आणि फास्ट चार्जिंग सिस्टमला देखील सपोर्ट करेल, असं म्हटलं जात आहे. बॅटरी सिंगल चार्जमध्ये कमीतकमी १७० किलोमीटर आणि इको मोडमध्ये जास्तीत जास्त २२० किलोमीटरची ड्रायव्हिंग रेंज देईल.

ही बॅटरी पूर्ण चार्ज होण्यासाठी फक्त ४ ते ५ तास लागतील, असं कंपनीचं म्हणणं आहे. एवढंच नाही तर, रीजनरेटिंग ब्रेकिंग टेक्नॉलॉजीच्या वापरासह युझरला चार दिवसांत त्याच्या स्कूटरला एकदाच चार्ज करावं लागेल. कंपनी या नवीन बॅटरीसह ३ वर्षाची वॉरंटी म्हणजे त्यात दोन वर्षांचे कव्हरेज आणि एक वर्ष विनामूल्य सर्व्हिसिंगदेखील देईल.

कोणत्या स्कूटरमध्ये होणार वापर?

समोर आलेल्या माहितीनुसार कंपनी ही बॅटरी तीन स्कूटरमध्ये वापरणार आहे. यामध्ये XGT-KM, X-One आणि XGT-X4 या मॉडेल्सचा समावेश आहे. या स्कूटर कंपनी डिलरशीपवर पुढील महिन्यापासून उपलब्ध करून देईल. सध्या आणखी एका नव्या बॅटरी तंत्रज्ञानावर काम सुरू असून त्याचा वापर X4 मध्ये करण्यात येणार असल्याचा दावा कंपनीनं केला आहे. तसंच ती ३५० किलोमीटरची ड्रायव्हिंग रेंजही देईल असं म्हटलं जात आहे.

Web Title: Komaki develops new Li ion battery with 220km range To debut in these electric scooters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.