Komaki Flora E-Scooter सिंगल चार्जवर 100 किमी पर्यंतची रेंज; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2022 06:49 PM2022-12-27T18:49:48+5:302022-12-27T18:50:33+5:30

Komaki Flora E-Scooter : या स्कूटरची किंमत, रायडिंग रेंज, टॉप स्पीड, फी आणि फीचर्सबद्दल जाणून घ्या...

Komaki Flora Electric Scooter Gives Range Up To 100 Km In Single Charge Know Price Features And Specifications | Komaki Flora E-Scooter सिंगल चार्जवर 100 किमी पर्यंतची रेंज; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Komaki Flora E-Scooter सिंगल चार्जवर 100 किमी पर्यंतची रेंज; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

googlenewsNext

नवी दिल्ली : इलेक्ट्रिक टू व्हीलर सेगमेंटमध्ये विविध किमती, रेंज आणि फीचर्ससह अनेक इलेक्ट्रिक स्कूटर उपलब्ध आहेत. यापैकी एक कोमाकी फ्लोरा (Komaki Flora) इलेक्ट्रिक स्कूटर आहे, जी कमी बजेटमध्ये लांब रेंजचा दावा करते. दरम्यान, या स्कूटरची किंमत, रायडिंग रेंज, टॉप स्पीड, फी आणि फीचर्सबद्दल जाणून घ्या...

Komaki Flora Price
कोमाकी फ्लोरा इलेक्ट्रिक स्कूटरची सुरुवातीची किंमत 78,999 रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) आहे. ऑन-रोड ही किंमत 82,746 रुपयांपर्यंत जाते. ही स्कूटर खरेदी करण्यासाठी ग्राहक कंपनीच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन बुक करू शकतात किंवा ही स्कूटर जवळच्या कोमाकी डीलरशिपला भेट देऊन देखील बुक करू शकतात.

Komaki Flora Battery and Top Speed
कोमाकी फ्लोरा 3000 डब्ल्यू इलेक्ट्रिक मोटरसह लिथियम आयन बॅटरी पॅक देण्यात आला आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, सामान्य चार्जरने चार्ज केल्यावर हा बॅटरी पॅक 4 ते 5 तासांत पूर्णपणे चार्ज होतो.

Komaki Flora Range and Top Speed
या इलेक्ट्रिक स्कूटरच्या रेंजबाबत कंपनीचा दावा आहे की, ही स्कूटर एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर 80 ते 100 किलोमीटरची रेंज देते.

Komaki Flora Braking and Suspension System
कोमाकी फ्लोरा इलेक्ट्रिक स्कूटरच्या पुढच्या चाकाला डिस्क ब्रेक तर मागच्या चाकाला ड्रम ब्रेक मिळतो. सस्पेन्शन सिस्टीम बद्दल बोलायचे झाले तर समोरच्या बाजूला टेलिस्कोपिक सस्पेंशन आणि मागील बाजूस स्प्रिंग बेस्ड शॉक ऍब्जॉर्बर सिस्टीम देण्यात आली आहे.

Komaki Flora Features
फीचर्सबद्दल सांगायचे तर, कंपनीने डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल, डिजिटल स्पीडोमीटर, डिजिटल ट्रिप मीटर, डिजिटल ओडोमीटर, पुश बटण स्टार्ट, क्रूझ कंट्रोल, सेल्फ डायग्नोस्टिक मीटर, अॅडिशनल बॅकरेस्ट, पार्किंग मोड, गियर मोड, ईबीएस, एलईडी हेड लाईट, एलईडी टेल लाईट, एलईडी टर्न सिग्नल लॅम्प सारखे फीचर्स देण्यात आली आहेत.

Web Title: Komaki Flora Electric Scooter Gives Range Up To 100 Km In Single Charge Know Price Features And Specifications

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.