फुल चार्जमध्ये 250 kms ची रेंज; ही स्वदेशी कंपनी आणतेय पहिली क्रुझर Electric Bike
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2021 04:49 PM2021-12-03T16:49:04+5:302021-12-03T16:49:20+5:30
Electric Vehicle : सध्या देशात इलेक्ट्रीक वाहनांकडे ग्राहकांचा कल मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे.
Electric Vehicle : सध्या देशात इलेक्ट्रीक वाहनांकडे अनेकांचा कल मोठ्या प्रमाणात वाढतान दिस आहे. पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किंमतीच्या पार्श्वभूमीवर अनेक जण आता त्यासाठी अन्य पर्याय शोधू लागले आहे. याला दुचाकीही अपवाद नाही. सध्या इलेक्ट्रीक बाईक खरेदी करण्यासाठी फारच कमी पर्याय उपलब्धआहेत. अशातच भारतातील इलेक्ट्रीक वाहन उत्पादक कंपनी कोमाकी इलेक्ट्रीक व्हेईकल (Komaki Electric Vehicles) अतिशय अॅग्रेसिव्हपणे स्पर्धेत उतरण्याच्या तयारीत आहे. कंपनी भारतीय बाजारपेठेत पहिली इलेक्ट्रीक क्रुझर बाईक लाँच करणार आहे. रिपोर्ट्सनुसार या बाईकचं नाव Komaki Ranger असं असून त्यात 250kms पर्यंतची रेंज मिळणार आहे.
कोमाकी रेंजर अधिकृतरित्या पुढील वर्षी जानेवारी महिन्यात लाँच केली जाऊ शकते. मात्र, लाँचपूर्वी कंपनीनं बाईकबाबत अनेक मोठे दावे केले आहेत. या इलेक्ट्रीक क्रूझर बाईकमध्ये 4 kW चा बॅटरी पॅक असेल, तसंच ती भारतातील इलेक्ट्रीक टू-व्हीलरमधील सर्वात मोठी बॅटरी असेल. यामुळेच कंपनी फुल चार्जमध्ये 250 किमी कव्हर करते. दिल्ली ते चंडिगढ या प्रवासाकरिता ही रेंज पुरेशी असल्याचंही कंपनीचं म्हणणं आहे.
कोणते असतील फीचर्स?
Komaki Ranger मध्ये 5000 वॉटची एक मोटर असेल, तसंच कठिण रस्त्यांवरही ही बाईक चांगला परफॉर्मन्स देईल असं कंपनीनं म्हटलंय. याशिवाय या बाईकमध्ये क्रुझ कंट्रोल, रिपेअर स्विच, रिव्हर्स स्विच, ब्लूटूथ आणि एक अॅडव्हान्स्ड ब्रेकिंग सिस्टमसारखी सुविधा देण्यात आलीये. दरम्यान लाँच नंतरच या बाईकची अधिकृत किंमत किती आहे हे सांगण्यात येईल. परंतु ही बाईक कमी किंमतीत लाँच केली जाईल असं आश्वासन कंपनीनं दिलंय. "सध्या काही गोष्टींवर अंतिम निर्णय घेणं बाकी आहे. आम्ही बाईकची किंमत कमी ठेवण्याचा विचार करत आहोत. सामान्य व्यक्तीला भारतात तयार झालेल्या एका क्रुझ बाईकचा आनंद घेता यावा असं आम्हाला वाटतं," असं मत कंपनीच्या इलेक्ट्रीक डिव्हिजनचे संचालक गुंजन मल्होत्रा यांनी सांगितलं.