Komaki LY इलेक्ट्रिक स्कूटर, अँटी थेफ्ट अलार्मसह सिंगल चार्जमध्ये 85 किमीपर्यंत रेंज
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2023 13:09 IST2023-01-30T13:06:06+5:302023-01-30T13:09:33+5:30
Komaki LY Electric Scooter : कोमाकीचा दावा आहे की एकदा फुल चार्ज केल्यानंतर ही इलेक्ट्रिक स्कूटर 80 ते 85 किलोमीटरची राइडिंग रेंज देते.

Komaki LY इलेक्ट्रिक स्कूटर, अँटी थेफ्ट अलार्मसह सिंगल चार्जमध्ये 85 किमीपर्यंत रेंज
नवी दिल्ली : देशात सध्या इलेक्ट्रिक वाहनांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यातच कोमाकी एलव्हाय (Komaki LY) इलेक्ट्रिक स्कूटर सध्या चर्चेत आहेत. या स्कूटरच्या किमतींसह राइडिंग रेंज, टॉप स्पीड, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या...
किती आहे किंमत?
कोमाकी एलव्हाय (Komaki LY) इलेक्ट्रिक स्कूटरची एक्स-शोरूम किंमत (दिल्ली) ऑन-रोड असताना 99,887 रुपयांपर्यंत जाते.
बॅटरी आणि मोटर
इलेक्ट्रिक स्कूटर इलेक्ट्रिक हब मोटरशी जोडलेल्या 62V, 34Ah लिथियम-आयन बॅटरी पॅक देण्यात आला आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, हा बॅटरी पॅक 4 ते 5 तासांत पूर्ण चार्ज होतो.
सिंगल चार्जवर किती वेळ चालते?
रेंजबद्दल बोलायचे झाल्यास, कोमाकीचा दावा आहे की एकदा फुल चार्ज केल्यानंतर ही इलेक्ट्रिक स्कूटर 80 ते 85 किलोमीटरची राइडिंग रेंज देते.
ब्रेकिंग आणि सस्पेंशन सिस्टम
कोमाकी इलेक्ट्रिक स्कूटरला फ्रंट आणि रिअर दोन्ही व्हीलवर डिस्क ब्रेक बसवण्यात आले आहेत. जे कॉम्बी ब्रेकिंग सिस्टमसह जोडलेले आहे. सस्पेन्शन सिस्टीम बद्दल बोलायचे झाले तर स्कूटरच्या फ्रंटला टेलीस्कोपिक फोर्क्स आणि रिअरला स्प्रिंग बेस्ड शॉक ऍब्सॉर्बर सिस्टीम देण्यात आली आहे.
काय आहेत फीचर्स?
कोमाकी एलव्हायमध्ये मिळणाऱ्या फिचर्सबद्दल सांगायचे झाले तर, यामध्ये पुश बटण स्टार्ट, डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल, डिजिटल ओडोमीटर, डिजिटल ट्रिप मीटर, अँटी थेफ्ट अलार्म, स्मार्ट बीएमएस, मल्टीपल सेन्सर्स, सेल्फ डायग्नोस्टिक, वायरलेस अपडेटेबल फीचर्स, एलईडी हेड लाईट, एलईडी टेल लाईट, टर्न सिग्नल लॅम्प, लो बॅटरी इंडिकेटर, अलॉय व्हील आणि ट्यूबलेस टायर यांसारखी फीचर्स देण्यात आली आहेत.