स्पोर्टी लूक अन् जबरदस्त पॉवर; KTM ने लॉन्च केली दमदार बाईक, किंमत फक्त...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2023 02:24 PM2023-06-19T14:24:27+5:302023-06-19T14:25:57+5:30

KTM 200 Duke: तरुणांमध्ये KTM बाईक्सची जबरदस्त क्रेझ आहे.

KTM 200 Duke: Sporty looks and powerful performance; KTM launches new bike, priced at just... | स्पोर्टी लूक अन् जबरदस्त पॉवर; KTM ने लॉन्च केली दमदार बाईक, किंमत फक्त...

स्पोर्टी लूक अन् जबरदस्त पॉवर; KTM ने लॉन्च केली दमदार बाईक, किंमत फक्त...

googlenewsNext


तरुणांमध्ये KTM च्या स्पोर्ट्स बाईक्सची जबरदस्त क्रेझ पाहायला मिळते. याच KTM ने आज भारतीय बाजारात आपल्या लोकप्रिय KTM 200 Duke चे अपडेटेट व्हर्जन लॉन्च केले आहे. कंपनीने या नवीन बाईकमध्ये नवीन फीचर्ससह कॉस्मेटिक बदल केले आहेत. यामुळे ही नवीन गाडी जुन्या गाडीपेक्षा अधिक आकर्षक दिसत आहे. कंपनीने नवीन Duke 200 ची किंमत 1.96 लाख रुपये (एक्स-शोरुम) ठेवली आहे. 

नवीन KTM 200 Duke मध्ये काय खास... 

कंपनीने या बाईकमध्ये नवीन मोठ्या आकाराचे LED हेडलँप दिले आहेत. यात 32 LED आणि 6 रिफ्लेक्टर आहेत. याशिवाय बीमसाठी जास्तीचा LED डे-टाइम-रनिंग लाइट्सदेखील आहे. KTM ने या बाईखच्या इंजिनमध्ये कोणतेही बदल केले नाहीत. ही बाईक आधीप्रमाणेच 199.5cc क्षमतेच्या सिंगल सिलिंडर लिक्विड कूल्ड इंजिनसह येईल. हे इंजिन 24bhp पॉवर आणि 19.2Nm टॉर्क जनरेट करेल. या गाडीला 6-स्पीड गिअबॉक्स दिला आहे. 

बाईकचे इतर फीचर्स...
या बाईकमध्ये रिअर आणि फ्रंट व्हिलला डिस्क ब्रेकसोबत ड्युअल चॅनेल एबीएस, यूएसएफ फोर्क, रिअरमध्ये मोनोशॉक, ट्यूबलेस टायर, अलॉय व्हील, अंडरबेली एग्झॉस्ट मिळतात. अपडेटेड 2023 KTM 200 Duke दोन कलर ऑप्शनसह येते. यात इलेक्ट्रॉनिक ऑरेंज आणि डार्क सिल्व्हर मेटॅलिक रंग मिळतो.

Web Title: KTM 200 Duke: Sporty looks and powerful performance; KTM launches new bike, priced at just...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.