KTM ने लाँच केली 390 अॅडव्हेंचर बाईक, किंमत आधीच्या मॉडेलपेक्षा 58,000 रुपये कमी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2023 03:07 PM2023-04-16T15:07:00+5:302023-04-16T15:07:33+5:30
खर्च वाचवण्यासाठी केटीएम अॅडव्हेंचर एक्समध्ये कलर टीएफटी इन्स्ट्रुमेंट क्लस्टर 250 अॅडव्हेंचरच्या एससीडी युनिटने बदलले जाऊ शकते
नवी दिल्ली : केटीएम इंडियाने भारतीय बाजारपेठेत एंट्री लेव्हल 390 अॅडव्हेंचर बाईक लॉन्च केली आहे. ही बाईक 2.8 लाख (एक्स-शोरूम, दिल्ली) च्या किमतीत लॉन्च करण्यात आली आहे. सध्याच्या मॉडेलपेक्षा ही किंमत 58,000 रुपये कमी आहे. मात्र, या मॉडेलमध्ये काही खास फीचर्स देण्यात आलेले नाहीत आणि त्यामुळेच कंपनीला त्याची किंमत कमी करण्यात यश आले आहे.
खर्च वाचवण्यासाठी केटीएम अॅडव्हेंचर एक्समध्ये कलर टीएफटी इन्स्ट्रुमेंट क्लस्टर 250 अॅडव्हेंचरच्या एससीडी युनिटने बदलले जाऊ शकते. बाईकमध्ये ड्युअल-चॅनल ABS सिस्टीमसह सुसज्ज असलेले फ्रंट आणि रिअर डिस्क ब्रेकला एक स्विचेबल फंक्शनसह ठेवण्यात आले आहेत, जे तुम्हाला जेव्हाही चारीबाजूला स्लाइड करायचे असेल आणि टरमॅकचा वापर करू इच्छित असाल, तेव्हा तुम्ही रिअर ABS बंद करू शकता.
'हे' आहेत फीचर्स
खर्च कमी करण्यासाठी व्हेरिएंटमध्ये कॉर्नरिंग ABS, क्विकशिफ्टर आणि ट्रॅक्शन कंट्रोल यासारख्या अनेक इलेक्ट्रॉनिक एड्सला हटवण्यात आळे आहे. केटीएम 390 अॅडव्हेंचर एक्समधील सध्याच्या व्हेरिएंटच्या तुलनेत डिझाईन फ्रंटवर कोणताही फरक नाही, कारण LED हेडलॅम्प, LED टर्न सिग्नल्स, LED टेल लॅम्प आणि बॉडी पॅनेल्स सारखेच आहेत.
रॉयल एनफिल्ड हिमालयन
हे मॉडेल रॉयल एनफिल्ड हिमालयनपेक्षा 65,000 रुपये महाग आहे. हिरो मोटोकॉर्प पुढील वर्षी XPulse 400 लाँच करण्याची शक्यता असल्याने ड्युअल पर्पज टूरिंग सेगमेंट अनेक नवीन मोटरसायकलच्या आगमनाची वाट पाहत आहे. रॉयल एनफिल्ड हिमालयन 450 देखील यावर्षी लॉन्च होणार आहे. सध्या, कंपनी लिक्विड-कूल्ड मोटरसह 390 अॅडला टक्कर देण्यासाठी या बाईकची चाचणी करत आहे.