KTM, रॉयल एन्फिल्डला टक्कर; 'या' कंपनीनं लाँच केल्या फीचर्सनं भरलेल्या तुफान 350cc बाईक्स

By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2022 03:15 PM2022-10-06T15:15:01+5:302022-10-06T15:15:35+5:30

जबरदस्त इंजिन आणि पाहा काय मिळतायत आणखी फीचर्स. टीएफटी स्क्रीनवर पाहता येणार व्हिडीओ.

KTM Royal Enfield a competitor Guangdong Tayo company has launched a stormy zontes 350cc bikes | KTM, रॉयल एन्फिल्डला टक्कर; 'या' कंपनीनं लाँच केल्या फीचर्सनं भरलेल्या तुफान 350cc बाईक्स

KTM, रॉयल एन्फिल्डला टक्कर; 'या' कंपनीनं लाँच केल्या फीचर्सनं भरलेल्या तुफान 350cc बाईक्स

Next

Guangdong Tayo मोटरसायकल टेक्नॉलॉजी ब्रँडने भारतीय बाजारपेठेत आपल्या नवीन Zontes 350 श्रेणीच्या मोटरसायकल लाँच केल्या आहेत. या सर्व बाइक 350cc सेगमेंटमध्ये लाँच करण्यात आल्या आहेत. कंपनीने या सेगमेंटमध्ये नेकेड स्पोर्ट्स, स्पोर्ट्स, कॅफे रेसर, टूरर आणि अॅडव्हेंचर टूरर या पाच बाइक्स लाँच केल्या आहेत. या बाइक्समध्ये कीलेस इग्निशन, स्लिपर क्लच, टीएफटी स्क्रीन, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीम आणि चार राइडिंग मोड यांसारखी जबरदस्त फीचर्स देण्यात आली आहेत. भारतीय बाजारपेठेत या बाइक्स रॉयल एनफिल्ड हिमालयन, केटीएम आणि येझदीच्या ॲडव्हेन्चर मॉडेल्सशी टक्कर देतील.

कसं आहे इंजिन?
सर्व बाईक्समध्ये बॉश EFI प्रणालीसह 348cc सिंगल-सिलिंडर लिक्विड-कूल्ड इंजिन देण्यात आले आहे. हे 9,500rpm वर 38hp पॉवर आणि 7,500rpm वर 32Nm टॉर्क जनरेट करते. इंजिन 6-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. सर्व मोटारसायकल्सना सारखेच हार्डवेअर आणि कंपोनंट्स देण्यात आलेले आहे. परंतु त्यांच्या डिझाईन आणि स्टाईलमध्ये फरक आहे.

सर्व मॉडेल्समध्ये फ्रन्टला 320mm डिस्क ब्रेक आणि मागील बाजूस 265mm डिस्क ब्रेक देण्यात आले आहेत. याशिवाय स्टँडर्ड युअल-चॅनेल ABS देखील उपलब्ध आहे. मोटारसायकलच्या पुढील बाजूस टेलिस्कोपिक फोर्क्स आणि मागील बाजूस मोनो-शॉक सस्पेंशन आहे. बाईक मजबूत आणि हलकी होण्यासाठी अॅल्युमिनियमचे व्हिल्स देण्यात आले आहेत.

काय आहेत फीचर्स?
या बाइक्समध्ये एलईडी हेडलाइट्स, एलईडी टेल लाइट्स आणि एलईडी ब्लिंकर आहेत. 4 रायडिंग मोड, कीलेस कंट्रोल सिस्टीम, दोन फास्ट चार्जिंग यूएसबी पोर्ट आणि टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीम (TPMS), ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, नेव्हिगेशन, नोटिफिकेशन्स, स्क्रीन मिररिंग, टेल लाईट्स, कलर एलसीडी डिस्प्लेसह पूर्णपणे डिजिटल इन्स्ट्रुमेंटेशन सारखे फीचर्स देण्यात आले आहेत.

कायआहेआहेकिंमत?
कंपनीच्या ब्लू शेडची सुरुवातीची किंमत 3.15 लाख रुपये आहे. ब्लॅक अँड व्हाईट शेडची किंमत 3.25 लाख रुपये आहे. Zontes 350 X ब्लॅक आणि गोल्ड व्हेरियंटची किंमत 3.35 लाख रुपये आहे. तर सिल्व्हर-ऑरेंज आणि ब्लॅक-ग्रीन व्हेरियंटची किंमत 3.45 लाख रुपये आहे. कॅफे रेसर मॉडेल Zontes GK350 च्या ब्लॅक-ब्लू व्हेरिएंटची किंमत 3.37 लाख रुपये आहे. तर ब्लॅक-गोल्ड आणि व्हाइट-ऑरेंजची किंमत 3.47 लाख रुपये आहे.

Zontes 350 T फक्त दोन व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आली आहे. त्याच्या ऑरेंज व्हेरिएंटची किंमत 3.37 लाख रुपये आहे आणि शॅम्पेन शेडची किंमत 3.47 लाख रुपये आहे. अॅडव्हेंचर टूरर मॉडेल दोन व्हेरिअंटमध्ये उपलब्ध आहे, ऑरेंज मॉडेलसाठी 3.57 लाख रुपये आणि शॅम्पेन मॉडेलसाठी 3.67 लाख रुपये मोजावे लागतील. या सर्व किंमती एक्स शोरूम आहेत.

Web Title: KTM Royal Enfield a competitor Guangdong Tayo company has launched a stormy zontes 350cc bikes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.