अवघ्या 2.9 सेकंदांत 100 चा भन्नाट वेग पकडणारी कार आली...!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2019 04:34 PM2019-02-07T16:34:16+5:302019-02-07T16:35:48+5:30
Huracan Evo मध्ये नवीन बंपर देण्यात आला आहे. याच्या डिझाईनमुळे वाऱ्याचा विरोध कमी करण्यात आला आहे.
नवी दिल्ली : जगप्रसिद्ध कार कंपनी Lamborghini ने भारतात अवघ्या 2.9 सेकंदांत 100 चा भन्नाट वेग पकडणारी कार लाँच केली असून या कारचे नाव Huracan Evo असे आहे. या कारची किंमत 3.73 कोटी रुपये ठेवण्यात आली आहे.
Huracan Evo मध्ये नवीन बंपर देण्यात आला आहे. याच्या डिझाईनमुळे वाऱ्याचा विरोध कमी करण्यात आला आहे. नवीन व्हील डिझाईन आणि साईड एअर इनटेक्स देण्यात आले आहेत. याकारमध्ये महत्वाचे म्हणजे रिअर व्हील स्टीअरिंगही देण्यात आले आहे. शिवाय चारही चाकांना टॉर्क व्हेक्टरिंग सिस्टिम देण्यात आली आहे. 8.4 इंचाची टचस्क्रीन सेंटर कन्सोलवर देण्यात आली आहे.
कारच्या डिझाईनमुळे हवा मागे जाण्यास जुन्या कारपेक्षा पाच पटींनी मदत होणार आहे. कारमध्ये 5.2 लीटरचे V10 इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 8,000 आरपीएमवर 630bhp ताकद प्रदान करते. तर 6,500 आरपीएमवर 600Nm पीक टॉर्क देते.
या कारचे वजन 1422 किलो एवढे आहे. ही कार 100 किमीचा वेग पकडण्यासाठी केवळ 2.9 सेकंद घेते. तर 0 ते 200 किमीचा वेग पकडण्यासाठी 9 सेकंद लागतात. तर ब्रेकिंग प्रणालीला 100 च्या वेगावरून शुन्यावर येण्यासाठी 31.9 मीटर एवढे कमी अंतर लागते. या कारचा सर्वाधिक वेग 325 किमी प्रति तास एवढा प्रचंड आहे.