Upcoming electric Scooter 2022: 'या' दिग्गज कंपन्या एकापेक्षा एक ढांसू इलेक्ट्रिक स्कूटर्स लाँच करणार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2022 11:44 AM2022-03-01T11:44:00+5:302022-03-01T11:45:53+5:30
Upcoming electric Scooter 2022 : आगामी काळात 3 इलेक्ट्रिक स्कूटर भारतात लॉन्च होणार आहेत.
नवी दिल्ली : इलेक्ट्रिक टू-व्हीलर सेगमेंटने गेल्या काही वर्षांत वेग घेतला आहे. बजाज ऑटोपासून ओलापर्यंत अनेक दुचाकी उत्पादकांनी इलेक्ट्रिक क्षेत्रात प्रवेश केला आहे. या वर्षी अनेक इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च होण्यासाठी सज्ज आहेत. दरम्यान, आगामी काळात 3 इलेक्ट्रिक स्कूटर्स भारतात लॉन्च होणार आहेत.
हिरो इलेक्ट्रिक स्कूटर (HERO ELECTRIC SCOOTER)
हिरो मोटारकॉर्प (Hero Motorcorp) या महिन्यात आपली नवीन इलेक्ट्रिक स्कूटर सादर करण्यासाठी सज्ज आहे, मात्र, कंपनीने अधिकृतपणे या इलेक्ट्रिक स्कूटरच्या लाँच करण्याची माहिती दिली नाही आहे. कंपनीने आगामी हिरो इलेक्ट्रिक स्कूटरचा टीझर शेअर केला होता, त्यानंतर हिरो स्कूटरचे चाहते, त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. शेअर व्हिडिओद्वारे दिसून येते की, आगामी नवीन हिरो इलेक्ट्रिक स्कूटर शानदार लुक, फ्लायस्क्रीन आणि लांब स्प्लिट सीटसह येईल.
होंडा इलेक्ट्रिक स्कूटर (HONDA ELECTRIC SCOOTER)
होंडा मोटारसायकल अँड स्कूटर इंडिया 2023 च्या (Honda Motorcycle & Scooter India 2023) सुरुवातीला इलेक्ट्रिक टू-व्हीलर क्षेत्रात प्रवेश करणार आहे. कंपनीने 2021 च्या उत्तरार्धात आपल्या डीलरशिपसह स्कूटरची व्यवहार्यता चाचणी सुरू केली आहे. रिपोर्टच्या म्हणण्यानुसार, होंडा PCX इलेक्ट्रिक आणू शकते. ही तीच ई-स्कूटर आहे, ज्याचे 2018 ऑटो एक्स्पोमध्ये प्रिव्ह्यू करण्यात आले होते. दरम्यान, होंडाने मे 2021 मध्ये भारतात त्याचे पेटंट दाखल केले होते. आगामी होंडा इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये काढता येण्याजोगी लिथियम-आयन बॅटरी असेल, ज्याला होंडा मोबाइल पॉवर पॅक असे नाव देण्यात येईल.
टीव्हीएस इलेक्ट्रिक स्कूटर (TVS ELECTRIC SCOOTER)
टीव्हीएस मोटर कंपनीने भारतीय बाजारपेठेत अनेक नवीन इलेक्ट्रिक बाइक आणि स्कूटर लॉन्च करण्याची योजना आखली आहे. येत्या काही वर्षांत "अर्धा डझनहून अधिक" इलेक्ट्रिक वाहने बाजारात आणण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे. हे सर्व इलेक्ट्रिक मॉडेल्स कंपनीच्या नवीन ईव्ही सब-ब्रँड अंतर्गत सादर केले जातील. TVS Creon संकल्पनेवर आधारित इलेक्ट्रिक स्कूटर नजीकच्या भविष्यात येण्याची शक्यता आहे. स्कूटर 12kW इलेक्ट्रिक मोटर आणि 3 लिथियम-आयन बॅटरीसह ऑफर केली जाऊ शकते.