कार खरेदी करताना असे वाचवा पैसे, 'हे' फिचर घेऊच नका; लाखोंची होईल बचत
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2023 01:40 PM2023-07-11T13:40:54+5:302023-07-11T13:41:31+5:30
कार खरेदी करत असताना आपल्याला अनेक नवे फिचर दिले जातात.
आपल्या प्रकत्येकाचे कार खरेदी करण्याचे स्वप्न असते. यासाठी आपण बचत करतो. पण, आपण जेव्हा कार खरेदीसाठी जातो तेव्हा अजूनही बचत करु शकतो. कारमध्ये बेस व्हेरिएंट आणि टॉप व्हेरिएंटमध्ये फरत असतो. या दोन्हीत फिचरही असतात, यात काही फिचर असे असतात या फिचरचा काही वापरही होत नाही. यामुळे आपण कार खरेदी करत असताना विचार करुन हे फिचर घेतले पाहिजेत.
Car चे हे फीचर कॅन्सरपासून करते बचाव! तुम्हाला माहीत आहे का? जाणून घ्या, खासियत
सॅटेलाईट नेव्हीगेशन
काही दिवसापूर्वी नेव्हीगेशन फिचर लोकप्रिय होते, पण आता हे फिचर आपल्या स्मार्टपोनमध्ये आले आहे. बर्याच गाड्यांमधील सॅटेलाइट नेव्हिगेशन धीमे, चुकीचे आणि गुंतागुंतीच्या इंटरफेसने भरलेले असते आणि मग ते वापरण्यासाठी तुम्हाला दैनंदिन अपडेट्सची समस्या असेल. हेच कारण आहे की हाय-एंड लक्झरी वाहनांमध्येही, प्रवासी अंगभूत उपग्रह नेव्हिगेशन वापरण्याऐवजी नेव्हिगेशनसाठी Apple CarPlay आणि Android Auto वर अवलंबून असतात.
स्वयंचलित हेडलाइट्स
लोकांना स्वयंचलित हेडलाइट्सचे वैशिष्ट्य देखील फारसे आवडत नाही. एक दशकापूर्वी वाहन उत्पादकांनी हे फिचर आणले होते.
वाइस कमांड फिचर
आता काही परवडणाऱ्या वाहनांमध्येही व्हॉईस कमांडची सुविधा उपलब्ध आहे, पण तरीही लोक त्यांची इन्फोटेनमेंट सिस्टीम, म्युझिक सिस्टीम बहुतेक वेळा मॅन्युअली वापरतात. नवीन गाडी आली तर फक्त छंदामुळे ती थोडी वापरली जाते, नंतर तीही बंद होते.
Gesture control
कारमध्ये हे फिचर कमीत कमी वापरले जाते. हे तंत्रज्ञान खूप जुने आहे, परंतु लोक ते फार कमी वापरतात. काहींसाठी, हे फिचर सोयीपेक्षा गैरसोयीचे आहे.