पुढच्या महिन्यात धमाका करण्यासाठी येतेय स्वस्तातली सिंपल इलेक्ट्रिक स्कूटर; मिळेल 151km रेंज अन् बरंच काही
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2023 07:18 PM2023-11-27T19:18:07+5:302023-11-27T19:18:51+5:30
किती असेल किंमत? जाणून घ्या...
आपण 15 डिसेंबर 2023 रोजी भारतीय बाजारात आपली सिंपल डॉट वन इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च करणार आहोत. तसेच लॉन्चिंग बरोबरच कंपनी आपल्या या मॉडेलसाठी प्री-बुकिंग देखील सुरू करेल. अशी घोषणा सिंपल एनर्जीकडून सोमवारी करण्यात आली आहे. सिंपल वननंतर, सिंपल डॉट वनला कंपनीच्या इलेक्ट्रिक टू-व्हीलर सीरिजमध्ये सब-व्हेरियंट म्हणून स्थान देण्यात आले आहे.
किती असेल किंमत? -
सिंपल वनच्या सिंपल डॉट वन मॉडेलकडे अधिक बजेट-फ्रेंडली मॉडेल म्हणून बघितले जात आहे. मात्र, या स्कूटरची आधिकृत किंमत पुढील महिन्यातच समजू शकेल. महत्वाचे म्हणजे, सिंपल वन मॉडेलची सुरुवातीची किंमत ₹1.45 लाख (कर आणि सबसिडीपूर्वी) एवढी आहे.
मॉडेलची रेन्ज 151 किमी -
सिंपल डॉट वनला एक निश्चित 3.7 kWh क्षमतेची बॅटरी मिळेल. महत्वाचे म्हणजे, या मॉडेलची प्रमाणित रेन्ज 151 किलोमीटर एवढी असल्याचा दावा कंपनीने केला आहे. या स्कूटरला विशेष पद्धतीने तयार करण्यात आलेले टायर देण्यात आले आहेत. हे टायर हिची ऑनरॉड रेन्ड वाढवतात.
या शिवाय या मॉडेलसोबत इतर हायलाइट्स शिवाय 30 लीटर अंडर-सीट स्टोरेज एरिया, टचस्क्रीन इंस्ट्रूमेंट क्लस्टर तसेच अॅप कनेक्टिव्हिटीसाठी सपोर्ट देखील देण्यात आला आहे. जानेवारी 2024 मध्ये या मॉडेलची डिलिव्हरी सुरू होण्याची शक्यता आहे.