हिरोची Xtreme 125 मोटरसायकल लाँच; 2 रुपयांत १ किमी अंतर कापेल एवढे मायलेज
By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2024 02:07 PM2024-01-23T14:07:20+5:302024-01-23T14:07:26+5:30
125 सीसी सेगमेंटची सर्वात प्रिमिअम आणि स्टायलिश दुचाकी असल्याचे सांगितले जात आहे.
जगातील सर्वात मोठी दुचाकी कंपनी हिरो मोटोकॉर्पने Xtreme 125 मोटरसायकल लाँच केली आहे. हिरो वर्ल्ड २०२४ च्या कार्यक्रमाच्या पहिल्याच दिवशी हिरोने ही मोटरसायकल लाँच केली आहे.
125 सीसी सेगमेंटची सर्वात प्रिमिअम आणि स्टायलिश दुचाकी असल्याचे सांगितले जात आहे. याच्या इंटीग्रेटेड ब्रेकिंग सिस्टिम व्हेरिअंटची एक्स शोरुम किंमत 95000 रुपये आणि एबीएस व्हेरिअंटची एक्स शोरुम किंमत 99,500 रुपये ठेवण्यात आली आहे.
ero Xtreme 125R च्या लुक आणि डिझाईनमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. फ्रंट लुक खूपच आकर्षक आहे, ज्यामध्ये एलईडी हेडलाइट्स बऱ्यापैकी आहेत. एलईडी टेललाइट्स आणि ब्लिंकर देखील वापरण्यात आले आहेत. शार्प फ्युएल टँक, स्प्लिट सीट सेटअप आणि स्प्लिट ग्रॅब रेल तसेच टायर हगर्स देण्यात आले आहेत.
यामध्ये 125 cc सेगमेंटचे पहिले एअर कूल्ड इंजिन देण्यात आले आहे. कंपनीच्या दाव्यानुसार 66 kmpl पर्यंतचे मायलेज ही मोटरसायकल देते. यात सिंगल आणि ड्युअल चॅनल एबीएस तसेच इंटिग्रेटेड ब्रेकिंग सिस्टीम सारखे पर्याय आहेत. यात टेलीस्कोपिक सस्पेन्शन आणि मागील बाजूस मोनोशॉक सस्पेन्शन देण्यात आले आहे.