कार जाऊ द्या, आता बाईकमध्येही आली 'एअरबॅग'; होंडाच्या या दुचाकीचा किंमत किती माहित्येय?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2024 05:56 PM2024-06-03T17:56:21+5:302024-06-03T18:05:10+5:30

Honda Goldwing 2024 असे या बाइकचे नाव असून ही भारतीय बाजारपेठेत खरेदीसाठी उपलब्ध आहे.

Leave the car, now in the bike also 'airbag'; Do you know the price of this Honda bike? | कार जाऊ द्या, आता बाईकमध्येही आली 'एअरबॅग'; होंडाच्या या दुचाकीचा किंमत किती माहित्येय?

कार जाऊ द्या, आता बाईकमध्येही आली 'एअरबॅग'; होंडाच्या या दुचाकीचा किंमत किती माहित्येय?

Bike with Airbags: चारचाकी वाहनांसाठी सुरक्षितता जितकी महत्त्वाची आहे तितकीच ती दुचाकीस्वारांसाठीही आहे. म्हणूनच बाईकची वेळोवेळी सर्व्हिसिंग करणे, बाईकस्वाराने हेल्मेटचा वापर करणे अशा गोष्टी केल्या जातात. पण आता बाईक्समध्ये एअरबॅगची सुविधा दिली जाईल असे म्हटले तर... ही गोष्ट विचित्र वाटली असते तरीही ते खरे आहे. त्यामुळेच होंडा कंपनीने एअरबॅग असलेली एक बाईक बाजारात आणली आहे. Honda Goldwing 2024 असे या बाइकचे नाव आहे. ही मोटारसायकल भारतीय बाजारपेठेत खरेदीसाठी उपलब्ध आहे.

Honda Goldwing 2024 ही बाईक तुम्ही बेंगळुरू, कोची, मुंबई, इंदूर, चेन्नई, कोलकाता आणि हैदराबाद येथे असलेल्या Honda च्या खास बिगविंग टॉपलाइन डीलरशिपमधून खरेदी करू शकता. भारतात त्याची ऑन-रोड किंमत सुमारे 50 लाख रुपये आहे. देशातील ही पहिली मोटरसायकल आहे ,जी एअरबॅग सेफ्टीसह येते.

Honda Goldwing मध्ये 1833cc, लिक्विड कूल्ड, 24 वाल्व्ह फ्लॅट, 6-सिलेंडर इंजिन आहे. ते 170Nm टॉर्क जनरेट करू शकते. यात 7-स्पीड ड्युअल क्लच गिअरबॉक्स देण्यात आला आहे. त्याचा टॉप स्पीड 230 किलोमीटर प्रति तास आहे. या मोटरसायकलमध्ये USB टाइप सी चार्जिंग, ब्ल्यु-टूथ कनेक्टिव्हिटी, जायरोस्कोप आणि 7-इंचाचा रंगीत TFT डिस्प्ले आहे, जो ऍपल कारप्ले आणि अँड्रॉइडला ऑटो सपोर्ट करतो.

Honda Goldwing बाइकमध्ये चार वेगवेगळे राइडिंग मोड आहेत. टूर, इकॉन, रेन आणि स्पोर्ट असे ते चार मोड आहेत. सुरक्षेच्या वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाले तर, एअरबॅग्स व्यतिरिक्त, यात टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम आहे. बाइकमध्ये इलेक्ट्रिक स्क्रीन देखील देण्यात आली आहे, जी डाव्या हँडलबारवरून कंट्रोल करता येऊ शकते. होंडा गोल्डविंग टूरच्या समोर एकच एअरबॅग आहे, जी अपघात किंवा धडक झाल्यास उघडेल आणि ड्रायव्हरचा जीव वाचवेल. याशिवाय बाइकमध्ये क्रूझ कंट्रोल, HSTC (होंडा सिलेक्टेबल टॉर्क कंट्रोल), 21 लीटर फ्युएल टँक आणि ट्रॅक्शन कंट्रोल फीचर देण्यात आले आहे.

Web Title: Leave the car, now in the bike also 'airbag'; Do you know the price of this Honda bike?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.