मारुती अल्टो पेक्षाही कमी मेन्टेनन्स; 4.99 लाखांच्या एसयुव्हीला 29 पैशांचा प्रतिकिमी खर्च

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2020 08:12 PM2020-12-20T20:12:54+5:302020-12-20T20:16:34+5:30

Nissan Magnite : निस्सानने काही दिवसांपूर्वी निस्सान मॅग्नाईट ही कॉम्पॅक्ट एसयुव्ही लाँच केली होती.  Nissan Magnite ची विशेष किंमत ही 4,99,000 लाखांत ठेवण्यात आली आहे. ही किंमत ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत असणार आहे.

Less maintenance than Maruti Alto; Nissan Magnite costs 29 paise per km | मारुती अल्टो पेक्षाही कमी मेन्टेनन्स; 4.99 लाखांच्या एसयुव्हीला 29 पैशांचा प्रतिकिमी खर्च

मारुती अल्टो पेक्षाही कमी मेन्टेनन्स; 4.99 लाखांच्या एसयुव्हीला 29 पैशांचा प्रतिकिमी खर्च

Next

नवी दिल्ली : मारुतीच्या स्विफ्टपेक्षाही कमी किंमतीत कॉम्पॅक्ट एसयुव्ही लाँच करून निस्सानने भारतीय बाजारात खळबळ उडवून दिली आहे. असे असताना आता प्रति किमी २९ पैसे मेन्टेनन्स आकारला जाणार असल्याचे जाहीर करून आणखी एक बॉम्ब फोडला आहे. 


निस्सानने काही दिवसांपूर्वी निस्सान मॅग्नाईट ही कॉम्पॅक्ट एसयुव्ही लाँच केली होती.  Nissan Magnite ची विशेष किंमत ही 4,99,000 लाखांत ठेवण्यात आली आहे. ही किंमत ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत असणार आहे. भारतीय बाजारपेठेसाठी कंपनीने आखलेल्या निसान नेक्स्ट या धोरणांतर्गत बनवण्यात आलेली ही पहिली गाडी असून आर्थिक वर्ष २०२०-२१च्या दुसऱ्या सहामाहीत ती प्रत्यक्ष रस्त्यांवर धावणार आहे. या नव्या छोट्या एसयुव्हीमध्ये लाइट्सएबर-स्टाइल टर्न इंडिकेटर्ससह अत्यंत शैलीदार असे हेडलँप्स, एल-शेप एलईडी डेटाइम रनिंग लाइट्स (डीआरएल), डॉमिनेटिंग फ्रंट ग्रिल देण्यात आले आहेत. वायरलेस चार्जर, एअर प्युरिफायर, पड्ल लँप्स, बियंट/मूड लायटिंग, जेबीएलचे प्रीमिअम स्पीकर्स देण्यात आले आहेत.  ६०-४० स्प्लिट फोल्डेबल रिअर सीटही देण्यात आली आहे. यामुळे लगेज स्पेस वाढविता येते. लगेज स्पेसची क्षमता ३३६ लीटर एवढी आहे.


मारुती, टाटाला जोरदार टक्कर; स्विफ्टपेक्षाही स्वस्त, 4.99 लाखांत कॉम्पॅक्ट SUV लाँच

या किंमतीवरून बाजारात चर्चा गरम असताना आता निस्सानने मेन्टेनन्स खर्च जाहीर केल्याने पुन्हा खळबळ उडाली आहे. निसान इंडिया कंपनीने  "निसान मॅग्नाईट केअर"  नावाने प्रीपेड मेंटेनन्स प्लॅन आणला आहे. या कारवर २ वर्षांची (५०,००० किलोमीटर्स) वॉरंटी असून ती ५ वर्षांपर्यंत (१,००,००० किलोमीटर्स) पर्यंत अत्यल्प खर्चात वाढविता येते. तर मेन्टेनन्स प्लॅनही दोन ते पाच वर्षांचा आहे. 'गोल्ड' आणि 'सिल्व्हर' अशा दोन पॅकेजपैकी एकाची निवड करता येईल. गोल्ड पॅकेजमध्ये समग्र देखभाल सेवा आणि सिल्व्हर पॅकेजमध्ये मूलभूत देखभाल सेवा मिळणार आहे. ही देखभाल योजना वाहन विकल्यानंतर नव्या मालकालाही दिली जाणार आहे. 


सर्व्हिस कॉस्टही समजणार
निसान सर्व्हिस हब (वेबसाईट ) आणि निसान कनेक्ट यावरून 'निसान सर्व्हिस कॉस्ट कॅल्क्युलेटर' उपलब्ध असल्याने अधिक पारदर्शकता आणली आहे. त्यामुळे ग्राहकांना अधिक कामगार अधिभार आणि सुट्या भागांची किमंत यांची माहिती आधीच मिळते. त्यानुसार त्यांना सर्व्हिस बुकिंगचे नियोजन करता येते.

Web Title: Less maintenance than Maruti Alto; Nissan Magnite costs 29 paise per km

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.