Lexus भारतीय इलेक्ट्रिक कार बाजारात क्रांती आणणार, 56 टक्के लक्झरी मार्केट कव्हर करण्याची तयारी!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2022 05:34 PM2022-03-21T17:34:58+5:302022-03-21T17:35:25+5:30

Lexus : सेल्फ-चार्जिंग हायब्रीड कारसाठी ओळखली जाणारी कंपनी आता बॅटरी इलेक्ट्रिक वाहने चालवण्यासाठी बाजारात आपला सध्याचा उत्पादन पोर्टफोलिओ वाढवण्याचा विचार करत आहे.

lexus electric car lexus gears up to drive in evs consolidate sales infra in india | Lexus भारतीय इलेक्ट्रिक कार बाजारात क्रांती आणणार, 56 टक्के लक्झरी मार्केट कव्हर करण्याची तयारी!

Lexus भारतीय इलेक्ट्रिक कार बाजारात क्रांती आणणार, 56 टक्के लक्झरी मार्केट कव्हर करण्याची तयारी!

Next

नवी दिल्ली : लक्झरी कार निर्माता लेक्सस (Lexus) आता भारतात आपल्या वाहनांची विक्री करण्यासाठी पुढील टप्प्याची रूपरेषा आखत आहे. लेक्सस जपानी ऑटो प्रमुख टोयोटाची लक्झरी कार शाखा आहे, या कंपनीने 2017 मध्ये भारतात काम करण्यास सुरुवात केली आणि सध्या देशात स्थानिक पातळीवर उत्पादित ES 300h सेडानसह सात मॉडेल्सची विक्री करते. सेल्फ-चार्जिंग हायब्रीड कारसाठी ओळखली जाणारी कंपनी आता बॅटरी इलेक्ट्रिक वाहने चालवण्यासाठी बाजारात आपला सध्याचा उत्पादन पोर्टफोलिओ वाढवण्याचा विचार करत आहे.

लेक्सस इंडियाचे अध्यक्ष नवीन सोनी यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेशी संवाद साधला. यावेळी नवीन सोनी म्हणाले की, कंपनी आता देशात सतत विकासाच्या टप्प्यात आहे. लक्झरी ऑटोमेकर सध्या संपूर्ण बॅटरी इलेक्ट्रिक कॉन्फिगरेशनसह त्याच्या मॉडेल UX चे भारतीय हवामानातील कामगिरी तपासण्यासाठी मूल्यमापन करत आहे.

भविष्यात चार्जिंगची पायाभूत सुविधा जसजशी वाढत जाईल, तसतशी कंपनी बॅटरी इलेक्ट्रिक वाहनांसाठी अधिकाधिक तयार होईल, असे सोनीने सांगितले. तसेच, याचा प्रवास सुरू करण्यासाठी आम्ही जपानमधून काही बॅटरी इलेक्ट्रिक वाहने (UX) आणली आहेत. आम्ही सध्या ग्राहकांसाठी वाहनाची चाचणी घेत आहोत. कंपनी गरम आणि प्रदूषित हवामानात बॅटरी चार्ज ठेवण्याची क्षमता तपासत आहे, असे ते म्हणाले. 

लवकरच लॉन्च होणार लेक्ससची एलएक्स  
कंपनी भारतात लवकरच एलएक्स (LX) लॉन्च करू शकते. ही कार जपानमधील कंपनीसाठी एक यशस्वी मॉडेल ठरली आहे. नवीन सोनी म्हणाले की, आम्ही लवकरच एलएक्स कार आणण्याचा विचार करत आहोत. तसेच, आम्ही लवकरच बुकिंग वगैरेची घोषणा करू.

'बाजारपेठेचा 56 टक्के हिस्सा कव्हर करणार'
नेटवर्क विस्ताराच्या योजनांबद्दल नवीन सोनी म्हणाले की, ऑटोमेकर पुढील दोन महिन्यांत चेन्नई आणि चंदीगडमध्ये आणखी तीन विक्री आउटलेट उघडण्याची योजना आखत आहे, ज्यामुळे भारतातील एकूण आउटलेटची संख्या सात झाली आहे. बाजारपेठेचा 56 टक्के हिस्सा कव्हर करणार आहे. 

Web Title: lexus electric car lexus gears up to drive in evs consolidate sales infra in india

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.