Solar-Electric car: जगातील पहिली सोलर-इलेक्ट्रिक कार लॉन्च, एका चार्जमध्ये तब्बल 700KMची रेंज; किंमत किती..?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2022 02:22 PM2022-10-17T14:22:05+5:302022-10-17T14:22:33+5:30

World first solar-electric car: नेदरलँडमधील एका कंपनीने ही सोलर-इलेक्ट्रिक कार लॉन्च केली आहे.

Lightyear 0 solar car | Solar-Electric car | World's first solar-electric car launched, range of 700KM in one charge | Solar-Electric car: जगातील पहिली सोलर-इलेक्ट्रिक कार लॉन्च, एका चार्जमध्ये तब्बल 700KMची रेंज; किंमत किती..?

Solar-Electric car: जगातील पहिली सोलर-इलेक्ट्रिक कार लॉन्च, एका चार्जमध्ये तब्बल 700KMची रेंज; किंमत किती..?

googlenewsNext

Lightyear 0 solar car Price and Features: एकीकडे जगभरात इलेक्ट्रिक कार्सवर वेगाने काम सुरू आहे. तर दुसरीकडे काही कंपन्या सौरऊर्जेवर चालणाऱ्या वाहनांवर काम करत आहेत. नेदरलँड्सस्थित कंपनीने जगातील पहिली सोलर कार LightYear 0 लॉन्च केली आहे. विशेष बाब म्हणजे ही सोलर-इलेक्ट्रिक कार आहे, जी एका चार्जवर सुमारे 700 किमीची रेंज देते. 

कारची किंमत किती ?
ही गाडी सध्या यूएईमध्ये (UAE) लॉन्च करण्यात आले आहे. कंपनीने आपल्या वेबसाइटवर या गाडीची किंमत 250,000 युरो (सुमारे 2 कोटी रुपये) ठेवली आहे. UAE मधील इच्छुक खरेदीदार कंपनीच्या वेबसाइटवरून गाडीसाठी ऑर्डर देऊ शकतात. ही गाडी 2023 च्या सुरुवातीपासून ग्राहकांना उपलब्ध होईल.


जबरदस्त पॉवर
रिपोर्ट्सनुसार, ही कार टेस्ला मॉडेल एस (Tesla Model S)पेक्षा दुप्पट कार्यक्षम आहे. Lightyear 0 उन्हाळ्याच्या हंगामात चार्ज न करता महिनोनमहिने वापरली जाऊ शकते. याचा सर्वोच्च वेग 160 किमी प्रतितास आहे आणि 10 सेकंदात शून्य ते 100 किमी प्रतितास वेग वाढतो. गाडीत 60 KW चा बॅटरी पॅक देण्यात आला आहे. 

700 किमीची रेंज
ही बॅटरी 174hp पॉवर जनरेट करण्यास सक्षम आहे. एका चार्जवर, याला बॅटरीपासून 625 किमीची रेंज मिळते, तर सौर उर्जेद्वारे 70 किमीची अतिरिक्त रेंज मिळते. अशा प्रकारे, कारची एकूण रेंज 695 किमी आहे. कारमध्ये 5 स्क्वेअर मीटर डबल सोलर बसवण्यात आले आहेत. या सोलर पॅनलमधून कारला उर्जा मिळते.

Web Title: Lightyear 0 solar car | Solar-Electric car | World's first solar-electric car launched, range of 700KM in one charge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.