दणक्यात पुनरागमन करण्याच्या तयारीत LML; कंपनी Electric Scooter लाँच करणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2021 07:06 PM2021-09-09T19:06:14+5:302021-09-09T19:06:41+5:30

दुचाकीचं उत्पादन करणारी स्वदेशी कंपनी LML नं भारतीय टू व्हिलर मार्केटमध्ये पुनरागमन करण्याची केलीये घोषणा.

LML Electric Scooter In The Making Confirms Company | दणक्यात पुनरागमन करण्याच्या तयारीत LML; कंपनी Electric Scooter लाँच करणार?

दणक्यात पुनरागमन करण्याच्या तयारीत LML; कंपनी Electric Scooter लाँच करणार?

Next
ठळक मुद्देदुचाकीचं उत्पादन करणारी स्वदेशी कंपनी LML नं भारतीय टू व्हिलर मार्केटमध्ये पुनरागमन करण्याची केलीये घोषणा.

दुचाकी उत्पादक स्वदेशी कंपनी एलएमएलनं (LML) भारतीय टु व्हिलर मार्केटमध्ये पुनरागमन करण्याची घोषणा केली आहे. एका जबरदस्त प्रोडक्टसह कंपनी इलेक्ट्रीक टू व्हिलर मार्केटमध्ये पुनरागमन करण्याची शक्यता आहे. या प्रसिद्ध स्कूटरचं नाव LML इलेक्ट्रीक असंच असेल. कंपनीनं दिलेल्या माहितीनुसार सध्या LML इलेक्ट्रीक सध्या नव्या प्रोडक्ट डेव्हलपमेंट स्ट्रॅटेजीवर काम करत आहे.

"आम्ही दणक्यात पुनरागमन करण्यासाठी उत्साहित आहोत. एक हायली इनोव्हेटिव्ह प्रोडक्ट आणण्यासाठी आम्ही सक्रियपणे डेव्हलपमेंट स्ट्रॅटजीवर काम करत आहोत. आमचा इनोव्हेटिव्ह प्रोडक्ट नव्या तंत्रज्ञानानं युक्त असेल आणि अर्बन मोबिलिटी स्पेसला मजबूती देईल," अशी प्रतिक्रिया LML इलेक्ट्रीकचे मॅनेजिंग डायरेक्टर आणि सीईओ योगेश भाटीया यांनी दिली. 

LML नं Vespa सोबत आणले नवे प्रोडक्ट
उत्तर प्रदेशातील कानपूरमधील LML ब्रान्ड स्कूटर्स, मोटरसायकल आणि मोपेडसह स्पेअर पार्ट्स आणि अॅक्सेससरीज तयार करण्यासाठी प्रसिद्ध होती. 1972 मध्ये सुरू करण्यात आलेल्या LML 1983 मध्ये पियाजिओ वेस्पा इटलीसोबत करार केला होता. तसंच 100cc स्कूटरचं उत्पादन सुरू केलं होतं. पियाजिओनं LML कंपनीमध्ये 25.50 टक्के हिस्साही खरेदी केला होता. दोन्ही कंपन्यांनी अनेक करार केले होते. परंतु ते 1999 मध्ये पूर्ण झाले. LML नं  अॅड्रिनो, एनर्जी आणि फ्रिडमसह अनेक दुचाकी भारतात लाँच केल्या. परंतु त्यांची हवी तितकी छाप पडली नाही. 

परंतु आता कंपनी इलेक्ट्रीक टू व्हिलर सेगमेंटवर तेजीनं काम करत आहे. अनेक ब्रान्ड्सची यात एन्ट्री झाली आहे. LML भारतीय बाजारपेठेत प्रीमिअम इलेक्ट्रीक स्कूटर आणू शकते. कंपनीचा या स्कूटरची स्पर्धा बजाज चेतक इलेक्ट्रीक, TVS iQube, Ather 450X, ओला S1 आणि Simple One सारख्या स्कूटर्ससोबत असेल. 

 

Web Title: LML Electric Scooter In The Making Confirms Company

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.