नवीन इलेक्ट्रिक कार खरेदी करायचीय? मग, अजून काही दिवस थांबा; लवकरच 'हे' शानदार मॉडेल्स लाँच होणार!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2023 02:02 PM2023-01-27T14:02:44+5:302023-01-27T14:03:12+5:30

lml star electric scooters : देशात नुकत्याच झालेल्या ऑटो एक्स्पोमध्ये ही स्कूटर प्रदर्शित करण्यात आली आहे.

lml star electric scooters may launch soon in india check the list upcoming electric scooters | नवीन इलेक्ट्रिक कार खरेदी करायचीय? मग, अजून काही दिवस थांबा; लवकरच 'हे' शानदार मॉडेल्स लाँच होणार!

नवीन इलेक्ट्रिक कार खरेदी करायचीय? मग, अजून काही दिवस थांबा; लवकरच 'हे' शानदार मॉडेल्स लाँच होणार!

googlenewsNext

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांत ऑटो क्षेत्रात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढल्याचे दिसून येत आहे. तुम्ही सुद्धा इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. देशात लवकरच काही नवीन इलेक्ट्रिक स्कूटर लाँच होणार आहे. त्यामुळे तुम्ही अजून काही दिवस थांबलात तर तुम्हाला आणखी अॅडव्हॉन्स फीचर्ससह स्कूटर खरेदी करता येईल. 
    
एलएमएल स्टार
दुचाकी उत्पादक कंपनी लवकरच आपली इलेक्ट्रिक स्कूटर LML Star लाँच करू शकते. देशात नुकत्याच झालेल्या ऑटो एक्स्पोमध्ये ही स्कूटर प्रदर्शित करण्यात आली आहे. या स्कूटरची पॉवर रेंज एका चार्जमध्ये 100 पर्यंत असेल आणि याची प्रारंभिक किंमत सुमारे एक लाख रुपये ठेवली जाऊ शकते.

टीव्हीएस क्रेऑन
टेस्ट दरम्यान TVS ची नवीन इलेक्ट्रिक स्कूटर अनेक वेळा दिसली आहे. कंपनी लवकरच याला बाजारात आणू शकते. याची प्रारंभिक किंमत 1 लाख रुपयांच्यावर ठेवली जाऊ शकते. मिळालेल्या माहितीनुसार, ही स्कूटर अनावरण केलेल्या क्रेऑन इलेक्ट्रिक स्कूटरवर आधारित असू शकते.

यामाहा निओ इलेक्ट्रिक स्कूटर
यामाहा आपल्या नवीन इलेक्ट्रिक स्कूटरसह या सेगमेंटमध्ये पाऊल ठेवणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कंपनी याला दुसऱ्या सहामाहीत सादर करू शकते. या स्कूटरचा टॉप स्पीड 40 किमी/तास असू शकते. ही स्कूटर एका चार्जवर 60 किलोमीटरची रेंज देण्यास सक्षम असेल. याची किंमत सुमारे 90,000 रुपये ठेवली जाऊ शकते.

हिरो इलेक्ट्रिक AE-29
Hero लवकरच बाजारात 729Ah बॅटरी पॅक असलेली इलेक्ट्रिक स्कूटर देखील लॉन्च करू शकते. याची रेंज एका चार्जवर 80 किलोमीटरपर्यंत असेल आणि याचा टॉप स्पीड 55 किमी/ताशी असेल. तसेच याची प्रारंभिक किंमत सुमारे 88,000 रुपये ठेवली जाऊ शकते.

बीएमडब्ल्यू CE-04
बीएमडब्ल्यूने (BMW) ही इलेक्ट्रिक स्कूटर एका कार्यक्रमाच्या वेळी सादर केली आहे. ही स्कूटर भारतीय बाजारपेठेला लक्षात घेऊन तयार करण्यात आली आहे. ही स्कूटर वर्षाच्या अखेरीस बाजारात पाहायला मिळेल. 85kWh लिथियम-आयन बॅटरी पॅकसह सुसज्ज ही स्कूटर 130 किमी पर्यंतची रेंज देण्यास सक्षम असेल.

Web Title: lml star electric scooters may launch soon in india check the list upcoming electric scooters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.