'या' इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत 50 हजारांपेक्षा कमी; जाणून घ्या टॉप स्पीड आणि फीचर्स...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2023 02:46 PM2023-01-16T14:46:42+5:302023-01-16T14:47:28+5:30
इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत, रेंज, बॅटरी पॅक, टॉप स्पीड, ब्रेकिंग सिस्टम यासह सर्वकाही जाणून घ्या...
नवी दिल्ली : सध्या इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढताना दिसून येत आहे. यातच एक लोहिया ओमा स्टार कंपनी आपली इलेक्ट्रिक स्कूटर (Lohia Oma Star) कमी बजेटमध्ये जास्त रेंज देत असल्याचा दावा करत आहे. लोहिया ओमा स्टार इलेक्ट्रिक स्कूटरची (Lohia Oma Star Electric Scooter) किंमत, रेंज, बॅटरी पॅक, टॉप स्पीड, ब्रेकिंग सिस्टम यासह सर्वकाही जाणून घ्या...
किंमत किती?
लोहिया ओमा स्टार इलेक्ट्रिक स्कूटरची एक्स-शोरूम दिल्ली किंमत 41,444 रुपये आहे. स्कूटरची ही किंमत ऑन रोड 46,082 रुपये होते.
स्कूटरची बॅटरी
या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये 48V, 20Ah क्षमतेचा लिथियम आयन बॅटरी पॅक आहे. या बॅटरीमध्ये 250W पॉवरची BLDC इलेक्ट्रिक मोटर जोडण्यात आली आहे. या बॅटरीच्या चार्जिंगबाबत कंपनीचा दावा आहे की, सामान्य चार्जरने चार्ज केल्यावर ही बॅटरी 6 ते 8 तासांत फूल चार्ज होते.
राइडिंग रेंज
राइडिंग रेंजबद्दल कंपनीचा दावा आहे की, ही इलेक्ट्रिक स्कूटर एकदा फूल चार्ज केल्यानंतर 60 किलोमीटरची राइडिंग रेंज देते आणि रेंजसोबत 25 किलोमीटर प्रति तासाचा टॉप स्पीड देखील मिळतो.
ब्रेकिंग सिस्टम
लोहिया ओमा स्टार इलेक्ट्रिक स्कूटरला फ्रंट आणि रिअर दोन्ही व्हीलमध्ये ड्रम ब्रेक बसवण्यात आले आहे, यासह कॉम्बी ब्रेकिंग सिस्टम देण्यात आली आहे. यासोबतच अलॉय व्हील आणि ट्यूबलेस टायर जोडण्यात आले आहेत. सस्पेन्शन सिस्टिमबद्दल बोलायचे झाले तर, कंपनीने फ्रंटला टेलिस्कोपिक सस्पेंशन आणि रिअरमध्ये स्प्रिंग बेस्ड शॉक ऍब्जॉर्बर सिस्टीम दिली आहे.
फीचर्स काय आहेत?
लोहिया ओमा डिजिटल स्पीडोमीटर, डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल, डिजिटल स्पीडोमीटर, पास स्विच, हॅलोजन हेडलाइट, बल्ब असलेला टेल लाइट, बल्ब असलेला टर्न सिग्नल लॅम्प, लो बॅटरी इंडिकेटर यासारखे फीचर्स मिळतात.