भारतीय रस्त्यांवर धावणार London ची Electric Taxi; पाहा केव्हा करू शकाल सैर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2021 04:06 PM2021-10-27T16:06:01+5:302021-10-27T16:06:24+5:30

London Taxi In India : लंडनच्या रस्त्यांवर धावणाऱ्या प्रसिद्ध टॅक्सीचं नवं मॉडेल भारतात दाखल होणार आहे.

Londons iconic taxis to touch down in Delhi india in electric form knwo more details | भारतीय रस्त्यांवर धावणार London ची Electric Taxi; पाहा केव्हा करू शकाल सैर

भारतीय रस्त्यांवर धावणार London ची Electric Taxi; पाहा केव्हा करू शकाल सैर

googlenewsNext
ठळक मुद्देलंडनच्या रस्त्यांवर धावणाऱ्या प्रसिद्ध टॅक्सीचं नवं मॉडेल भारतात दाखल होणार आहे.

लंडनच्या रस्त्यांवर धावणाऱ्या प्रसिद्ध टॅक्सीचं नवं मॉडेल भारतात दाखल होणार आहे. या Next Gen मॉडेलला LEVC TX या नावानं देखील ओळखलं जातं. TX चं उत्पादन करणारी कंपनी लंडन इलेक्ट्रीक व्हेईकल कंपनीनं (LEVC) एक्सक्लुसिव्ह मोटर्ससोबत भागीदारी केली आहे. ही कंपनी भारतात काही लक्झरी ब्रँड्सच्या वितरणाचं काम करते. LEVC चं स्वामित्व चिनी कार उत्पादक कंपनी Geely कडे आहे. ही कंपनी कोवेंट्री, युके येथे कार्यरत आहे.

LEVC नुसार, नवीन TX लंडन कॅब ही पहिल्यांदा 2017 मध्ये सादर करण्यात आली होती. कॅब अॅल्युमिनियम बाँडिंग तंत्रज्ञान वापरून तयार केली गेली आहे, ज्यामुळे ती वजनाने खूपच हलकी आहे आणि उत्तम ड्रायव्हिंगची रेंज देण्यासही मदत करते. तिची स्टाइलिंग मुख्यत्वे जुन्या मॉडेलसारखीच आहे, त्याची हॅकनी कॅरेज बॉडीस्टाइल सहज ओळखता येते.

कंपनीनं केले बदल
पण कंपनीने नवीन मॉडेलमध्ये काही खास बदलही केले आहेत. यामध्ये फ्रंट साईडला एलईडी रनिंग लाइट्स देण्यात आले आहेत. नवीन TX ची उंची 4,860mm आहे, जी मागील मॉडेलपेक्षा थोडी अधिक आहे. याशिवाय, त्याची लांबी देखील सुमारे 280 मिमी अधिक आहे. कारमध्ये अधिक जागा स्पेस असेल हे यावरून स्पष्ट होत आहे. कारचा मागील दरवाजा ९० अंशापर्यंत उघडता येतो आणि त्यात एकूण ६ जणांची बसण्याची व्यवस्था आहे.

काय आहे विशेष?
आधीच्या मॉडेलमध्ये डिझेल इंजिन देण्यात आलं होतं. परंतु नवीन TX पूर्णपणे इलेक्ट्रिक हायब्रिड प्रणालीवर चालते. यामध्ये कंपनीने व्होल्वोचे 1.5 लिटर क्षमतेचे 3 सिलिंडर टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन दिले आहे. हे इंजिन 81hp पॉवर जनरेट करते. या कारमध्ये 33kWh क्षमतेचा बॅटरी पॅक आहे, जो LG Chem कडून घेण्यात आला आहे. हीच कंपनी Hyundai ला त्यांच्या इलेक्ट्रीक वाहनांसाठी बॅटरी देखील पुरवते. या बॅटरीचा वापर Hyundai Kona सारख्या मॉडेल्समध्येही करण्यात आला आहे.

“भारत ही इलेक्ट्रीक वाहनांसाठी एक उदयोन्मुख बाजारपेठ आहे आणि LEVC साठी देशात प्रवेश करण्यासाठी यापेक्षा चांगली वेळ असू शकत नाही. वाहनाची टेक्नॉलॉजी, अॅस्थेटिक्स येणाऱ्या दिवसांमध्ये भारतीय ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी पुरेसे आहे," अशी प्रतिक्रिया एक्सक्लुसिव्ह मोटर्सचे व्यवस्थापकीय संचालक सत्य बागला यांनी दिली. मात्र कंपनी ही कार भारतीय बाजारपेठेत कधी प्रवेश करेल याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

Web Title: Londons iconic taxis to touch down in Delhi india in electric form knwo more details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.