सिंगल चार्जवर TVS iQube ची रेंज 145 किमी , 24 पेक्षा अधिक मिळतील फीचर्स
By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2023 01:26 PM2023-01-03T13:26:59+5:302023-01-03T13:27:33+5:30
इलेक्ट्रिक स्कूटरच्या (Electric Scooters) सध्याच्या रेंजमध्ये आपण टीव्हीएस आयक्युब (TVS iQube) इलेक्ट्रिक बद्दल जाणून घेऊया. ही एक हाय-टेक फीचर्स आणि लांब रेंज असलेली इलेक्ट्रिक स्कूटर आहे.
नवी दिल्ली : इलेक्ट्रिक टू व्हीलर सेक्टरमध्ये स्कूटर आणि बाइक्सची मोठी रेंज पाहायला मिळते. कमी बजेटच्या बेसिक इलेक्ट्रिक स्कूटरपासून ते जास्त रेंजच्या प्रीमियम स्कूटर्सपर्यंत... इलेक्ट्रिक स्कूटरच्या (Electric Scooters) सध्याच्या रेंजमध्ये आपण टीव्हीएस आयक्युब (TVS iQube) इलेक्ट्रिक बद्दल जाणून घेऊया. ही एक हाय-टेक फीचर्स आणि लांब रेंज असलेली इलेक्ट्रिक स्कूटर आहे.
TVS iQube Electric Price
टीव्हीएस मोटर्सने (TVS Motors) आत्तापर्यंत iQube इलेक्ट्रिकचे दोन व्हेरिएंट बाजारात लॉन्च केले आहेत, ज्यामध्ये पहिला व्हेरिएंट स्टँडर्ड आहे ज्याची किंमत आहे 1,61,056 रुपये आणि दुसऱ्या व्हेरिएंटची किंमत आहे 1,60,976 रुपये आहे. या दोन्ही किंमती (एक्स-शोरूम, दिल्ली) आहेत. कंपनी लवकरच iQube इलेक्ट्रिकचे स्वस्त व्हर्जन TVS iQube Electric ST लाँच करणार आहे.
TVS iQube Electric Battery and Motor
iQube इलेक्ट्रिकमध्ये देण्यात असलेला बॅटरी पॅक हा 4.56 kWh क्षमतेचा लिथियम आयन बॅटरी पॅक असून त्यात 4400 W पॉवर BLDC मोटर आहे. कंपनीच्या मते, या बॅटरी पॅकला 0 ते 80 टक्के चार्ज होण्यासाठी 4 तास आणि 6 मिनिटे लागतात. TVS ने या स्कूटरसोबत फास्ट चार्जिंगचा ऑप्शन देखील दिला आहे, ज्यामध्ये बॅटरी बॅक 2 तास 50 मिनिटांत 80 टक्के चार्ज होते.
TVS iQube Electric Range and Top Speed
टीव्हीएस कंपनीच्या मते iQube इलेक्ट्रिक एका चार्जवर 145 किमीची रेंज ऑफर करते आणि या रेंजसह कंपनी 82 किमी प्रतितासच्या टॉप स्पीडचा दावा करते. या स्कूटरमध्ये कंपनीने दोन राइडिंग मोडचा (इको, स्पोर्ट) पर्याय दिला आहे.
TVS iQube Electric Braking and Suspension
ब्रेकिंग सिस्टममध्ये कंपनीने स्कूटरच्या पुढील चाकामध्ये डिस्क ब्रेक आणि मागील चाकामध्ये ड्रम ब्रेकचा पर्याय दिला आहे, ज्यामध्ये कॉम्बी ब्रेकिंग सिस्टम बसवण्यात आली आहे. सस्पेन्शन सिस्टीम बद्दल बोलायचे झाले तर समोरच्या बाजूला टेलिस्कोपिक सस्पेन्शन आणि मागच्या बाजूला अॅडजस्टेबल हायड्रॉलिक ट्विन ट्यूब शॉक ऍब्जॉर्बर सस्पेन्शन सिस्टीम देण्यात आली आहे.
TVS iQube Electric Features
TVS iQube मधील फीचर्सबद्दल सांगायचे तर पुश बटण स्टार्ट, डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल, नेव्हिगेशन, कॉल, एसएमएस अलर्ट, जिओ फेन्सिंग, अँटी थेफ्ट अलार्म, यूएसबी चार्जिंग पोर्ट, म्युझिक कंट्रोल, ओटीए, एक्सटर्नल स्पीकर, डिजिटल स्पीडोमीटर, डिजिटल ट्रिप मीटरसारखी फीचर्स देण्यात आली आहेत. या फीचर्सशिवाय, या स्कूटरमध्ये मिळणाऱ्या अतिरिक्त फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर, नंबर प्लेट लॅम्प, पार्किंग असिस्ट, लाइव्ह लोकेशन स्टेटस, क्रॅश अँड फॉल अलर्ट, जीएसएम कनेक्टिव्हिटी, पार्किंग ब्रेक लीव्हर, डॉक्युमेंट स्टोरेज यांसारखे अनेक फीचर्स यात देण्यात आले आहेत.