TATA Motors Cars Price Hike: टाटा मोटर्सची गाडी घेण्याच्या विचारात आहात?, कंपनी देणार ग्राहकांना धक्का; त्याआधीच विचार करा पक्का

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2022 02:11 PM2022-01-18T14:11:25+5:302022-01-18T14:11:49+5:30

Tata Motors Hikes Prices: आता टाटा मोटर्सनंही घेतला मोठा निर्णय.

looking to buy tata motors cars after maruti suzuki india company increased cars price today last day | TATA Motors Cars Price Hike: टाटा मोटर्सची गाडी घेण्याच्या विचारात आहात?, कंपनी देणार ग्राहकांना धक्का; त्याआधीच विचार करा पक्का

TATA Motors Cars Price Hike: टाटा मोटर्सची गाडी घेण्याच्या विचारात आहात?, कंपनी देणार ग्राहकांना धक्का; त्याआधीच विचार करा पक्का

Next

मारुती सुझुकीनंतर (Maruti Suzuki) आता टाटा मोटर्सनेही (TATA Motors) नवीन वर्षात प्रवासी गाड्यांच्या किमती वाढवण्याची (Vehicle Price Increased) घोषणा केली आहे. टाटा मोटर्सच्या प्रवासी गाड्यांच्या नवीन किंमती बुधवार १९ जानेवारी २०२२ पासून लागू होतील. 

टाटा मोटर्सने जाहीर केले आहे की कंपनी १९ जानेवारीपासून त्यांच्या प्रवासी वाहनांच्या किमती सरासरी ०.९ टक्क्यांनी वाढवणार आहे. कोणत्या गाड्यांची किंती किंमत वाढेल हे त्या गाडीच्या व्हेरिअंटवर अवलंबून असेल. टाटा मोटर्सने १८ जानेवारी २०२२ पूर्वी वाहनं बुक केलेल्या ग्राहकांवर दरवाढीचा परिणाम होणार नसल्याचे म्हटलं आहे. त्याच वेळी, टाटा मोटर्सने ग्राहकांच्या फिडबॅक्सच्या आधारावर काही व्हेरिअंटच्या किमती १० हजार रुपयांनी कमी करण्याचाही निर्णय घेतला आहे.

'उत्पादन खर्च वाढला'
वाढत्या खर्चामुळे कंपनीला किंमत वाढवण्याचा निर्णय घ्यावा लागला आहे. वाढलेल्या खर्चाचा मोठा हिस्सा कंपनी स्वतः सहन करत आहे, परंतु काही भाग किमती वाढवून पूर्ण केला जात आहे, असं टाटा मोटर्सनं आपल्या निवेदनात म्हटलं आहे. टाटा मोटर्सने १ जानेवारी २०२२ पासून त्यांच्या व्यावसायिक वाहनांच्या (Commercial Vehicles)  किमती वाढवल्या आहेत.

यापूर्वी, मारुती सुझुकी इंडियानं (Maruti Suzuki India) त्यांच्या अनेक मॉडेल्सच्या किमती ४.३ टक्क्यांपर्यंत वाढवल्या आहेत. उत्पादन खर्चातील (Production Cost) वाढीचा भार अंशतः कमी करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आलं आहे. कंपनीने आपल्या विविध मॉडेल्सच्या किमती ०.१ ते ४.३ टक्क्यांनी वाढवल्या आहेत.

Web Title: looking to buy tata motors cars after maruti suzuki india company increased cars price today last day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.