भारतात येतीये ही ब्रिटीश स्पोर्ट्स कार कंपनी, 9 नोव्हेंबर लॉन्च होणार पहिली सुपरकार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2023 05:49 PM2023-11-08T17:49:03+5:302023-11-08T17:50:02+5:30
Lotus: मॅक्लारेननंतर आणखी एक ब्रिटीश स्पोर्ट्स कार कंपनी भारतात दाखल होत आहे.
Lotus To Enter India: भारताच्या ऑटोमोबाईल क्षेत्रात झपाट्याने वाढ होत आहे, त्यामुळेच जगभरातील अनेक कंपन्या भारतात आपलाय व्यवसाय सुरू करताहेत. मॅक्लारेननंतर आणखी एक ब्रिटीश स्पोर्ट्स कार कंपनी भारतात दाखल होणार आहे. जागतिक स्तरावर एमेया(Emeya), इलेट्रे(Eletre), एमिरा(Emira) आणि इविजा(Evija) सारख्या स्पोर्ट्स कार बनवारी कंपनी 'लोटस' भारतात दाखल होणार आहे.
कंपनीने 9 नोव्हेंबर 2023 रोजी भारतीय बाजारपेठेत प्रवेश करण्याची पुष्टी केली आहे. लोटसने भारतातील डीलर आणि सर्व्हिस पार्टनर म्हणून नवी दिल्लीस्थित एक्सक्लुझिव्ह मोटर्सशी हातमिळवणी केली आहे. एक्सक्लुझिव्ह मोटर्स भारतातील बेंटले मोटर्सची विक्री करते. लोटस सुरुवातीला 1 मॉडेल लॉन्च करू शकते, त्यानंतर ग्राहकांच्या प्रतिसादावर उर्वरित मॉडेल्स लॉन्च करण्याचा विचार करेल.
लोटसने भारतात लॉन्च होणाऱ्या मॉडेलचे नाव अद्याप उघड केले नसले तरी, सुपरकार ब्रँड पेट्रोलवर चालणारी एमिरा स्पोर्ट्सकार किंवा ऑल-इलेक्ट्रिक एलेट्रे एसयूव्ही लॉन्च करण्याची अपेक्षा आहे. त्याच्या गाड्या भारतात कम्लीटली बिल्ट युनिट (CBU) म्हणून येतील.
कशी आहे लोटस एमिरा
लोटस एमिया ही टू-डोअर स्पोर्ट्स कार आहे, जी 2021 मध्ये जागतिक बाजारपेठेत लॉन्च करण्यात आली होती. ही दोन इंजिन पर्यायांसह उपलब्ध आहे. पहिले इंजिन 3.5-लिटर सुपरचार्ज V6 पेट्रोल इंजिन आहे, जे 400 हॉर्सपॉवर जनरेट करते. हे इंजिन 6-स्पीड मॅन्युअल किंवा 6-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससह येते. ही सुपरकार 4.4 सेकंदात 0 ते 100 किमी प्रति तास वेग पकडू शकते.
दुसरी कार 2.0-लिटर 4-सिलेंडर टर्बो-पेट्रोल युनिट आहे, जी 362 हॉर्स पॉवर आणि 430 Nm टॉर्क जनरेट करते. हे इंजिन 8-स्पीड ड्युअल-क्लच ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससह येते. ही कार 4.2 सेकंदात 0 ते 100 किमी प्रति तास वेग पकडू शकते. या कारचा टॉप स्पीड ताशी 296 किमी आहे. एमियाची किंमत सुमारे 2.50-2.70 कोटी रुपये (एक्स-शोरूम) असण्याची शक्यता आहे.
लोटस इलेट्रे
Lotus Electre ब्रँडची पहिली ऑल-इलेक्ट्रिक SUV आहे. ही इलेक्ट्रिक प्रीमियम आर्किटेक्चरवर आधारित आहे आणि त्यात ड्युअल-मोटर सेटअप आहे. ही 600 पेक्षा जास्त हॉर्स पॉवर जनरेट करते. लोटसचा दावा आहे की, इलेट्रा 3 सेकंदांपेक्षा कमी वेळेत 0 ते 100 किमी प्रतितास वेग वाढवू शकते. कारचा टॉप स्पीड ताशी 260 किमी आहे. या कारची किंमत 2.5-3.0 कोटी रुपये (एक्स-शोरूम) असू शकते.