भारतात लाँच झाली ही 38 लाखांची लक्झरी Chieftain Elite बाईक, पहा काय आहे खास...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2018 11:17 AM2018-08-13T11:17:28+5:302018-08-13T11:29:13+5:30
जगभरात केवळ 350 बाईक विकणार इंडियन कंपनी
नवी दिल्ली : बुलेटप्रेमींनाही हवीहवीशी वाटेल अशी धाकड बाईक आज भारतात लाँच झाली. इंडियन कंपनीच्या Chieftain Elite या बाईकची किंमतही बुलेटपेक्षा कित्येक पटींनी अधिक आहे. तब्बल 38 लाख. म्हणजेच एखाद्या लक्झरी कारच्या तोडीची. हे खरेही आहे. या बाईकमध्ये लक्झरी कारमध्ये मिळणाऱ्या सर्व सुखसोई आहेत. चला तर मग... एक राईड तर बनतेच.
या बाईकची घोषणा गेल्या वर्षीच इंडियन या कंपनीने केली होती. जगभरात केवळ 350 बाईक विकल्या जाणार आहेत. या कंपनीची आणखी एक बाईक भारतात विकली जात आहे. ती आहे Roadmaster Elite. तिची किंमत एक्स-शोरुम 48 लाख आहे.
Chieftain Elite या बाईकला मशीनने रंग न देता रंगारींकडून रंग देण्यात आला आहे. या कामासाठी एका बाईकला तब्बल 25 तास लागतात. या बाईकच्या स्टँडर्ड व्हर्जनच्या तुलनेत बरेच बदल करण्यात आले आहेत.
फोटो गॅलरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा
( 'ही' भारतीय बाईक बघून बुलेटही वाटेल 'पानी कम')
Chieftain Elite मध्ये राईड कमांड इन्फोटेन्मेंट सिस्टिमही देण्यात आली आहे. तसेच ब्लुटुथ कनेक्टिव्हीटी, नेव्हिगेशन आणि 200 वॉटची ऑडिओ सिस्टिमही देण्यात आली आहे. सीट हातांनी शिवलेल्या लेदरपासून तर पाय ठेवण्यासाठी अॅल्युमिनिअमचा फ्लोअरबोर्ड देण्यात आला आहे.
All hail the legend!
— Indian Motorcycle IN (@IndianMotorIND) August 13, 2018
The 2018 Chieftain Elite limited edition has officially made its spectacular Indian debut!
This Indian is all set to take the country by storm. Welcome to the glorious era of the Chieftain Elite - the best of the best!#IndianGoesEliteAgainpic.twitter.com/PAMqCPMszH
पुढील चाकाला दोन डिस्क आणि मागील चाकाला एक डिस्क ब्रेक दिला आहे. 1811 सीसीच्या इंजिनच्या वेगाला काबुत ठेवण्यासाठी तेवढी गरजही आहे. पुढील टायर 19 इंचाचा तर मागील टायर 16 इंचाचा आहे. डनलपपासून बनलल्या रबरचा वापर केला गेला आहे. या सुपर बाईकचे वजनही तब्बल 388 किलो आहे.
बुलेट नाही, या बाईकना देणार टक्कर...
भारतात बुलेटप्रेमींची संख्या जास्त असली तरीही ही बाईक जागतिक स्पर्धकांना नजरेसमोर ठेवून बनविण्यात आली आहे. ती हार्ले डेव्हिडसनची स्ट्रीट ग्लाईड आणि होंडाच्या गोल्ड विंगला टक्कर देणार आहे.