मेड इन इंडिया Kia Sonet आली; जाणून घ्या फिचर्स आणि बरेच काही

By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2020 02:13 PM2020-08-07T14:13:31+5:302020-08-07T14:15:32+5:30

भारतात कियाची ही तिसरी कार असून याआधी कंपनीने Kia Seltos आणि Kia Carnival बाजारात आणलेली आहे. यापैकी सेल्टॉसने मंदीतही मोठी विक्री नोंदविली होती. 

Made in India kia sonet unveiled; here is everything you need to know | मेड इन इंडिया Kia Sonet आली; जाणून घ्या फिचर्स आणि बरेच काही

मेड इन इंडिया Kia Sonet आली; जाणून घ्या फिचर्स आणि बरेच काही

Next

नवी दिल्ली : Kia Motors ची मेड इन इंडिया कॉम्पॅक्ट SUV Kia Sonet भारतासह जगभरातील बाजारपेठांसाठी लाँच करण्यात आली आहे. ही कार यंदाच्या सर्वाधक चर्चेत असलेल्या कारपैकी एक आहे. भारतात कियाची ही तिसरी कार असून याआधी कंपनीने Kia Seltos आणि Kia Carnival बाजारात आणलेली आहे. यापैकी सेल्टॉसने मंदीतही मोठी विक्री नोंदविली होती. 


Kia Sonet ला खासकरून भारतासाठी बनविण्यात आले आहे. ही कार आंध्र प्रदेशच्या अनंतपूरमधील प्रकल्पामध्ये बनविण्यात आली आहे. इथूनच जगभरात ही कार पाठविली जाणार आहे. कंपनीने या कारला कनेक्टेड कार म्हणून समोर आणले आहे. ही कार iMT आणि व्हायरस प्रोटेक्शनसारख्या हाय़टेक फिचरने युक्त आहे. 
कियाने या कॉम्पॅक्ट SUV Kia Sonet मध्ये 10.25 इंचाची टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टिम दिली आहे. याशिवाय Bose ची 7 स्पीकर सिस्टीम, इलेक्ट्रीक सनरूफ, फ्रंट व्हेंटिलेटेड सीट्स देण्यात आले आहेत. या कारला स्मार्टवॉचने देखील कनेक्ट करता येणार आहे. 


कियाच्या या कारमध्ये तीन इंजिन ऑप्शन मिळणार आहेत. शिवाय यामध्ये 5 स्पीड मॅन्युअल, 6 स्पीड मॅन्युअल, 6 स्पीड AT आणि 6 स्पीड iMT चा पर्याय मिळणार आहे. किया सोनेट GT Line मध्ये 1.0 लीटर पेट्रोल इंजिन आणि 1.5 लीटर टर्बो डिझेल इंजिन मिळणार आहे. 

कियामध्ये सेफ्टीफिचर्सही देण्यात आले आहेत. 6 एअरबॅग, ABS, EBD, फ्रंट आणि रियर पार्किंग सेंसर, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीम (TPMS), ऑटो हेडलाइट, ब्रेक असिस्ट (BA), इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल (ESC), हिल असिस्ट कंट्रोल (HAC) सारखे फिचर आहेत. कियाची ही कार मारुतीच्या ब्रेझा, इकोस्पोर्ट, नेक्सॉन, व्हेन्यूला टक्कर देणार आहे. 

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

Video: केरळच्या प्रसिद्ध मुन्नार टेकडीवर भूस्खलन; 5 मृत; 80 जण ढिगाऱ्याखाली

नाशिक हादरले! एकाच कुटुंबातील चौघांची निघृण हत्या; दोन लहान मुलांचाही समावेश

नवी सुविधा! बिना इंटरनेट पैसे पाठविता येणार; RBI ची घोषणा

मॉडेलिंग सोडून UPSC दिली; ऐश्वर्या श्योराण पहिल्याच फटक्यात IAS बनली

‘सुसाईड नोट’मध्ये अर्णब गोस्वामीचे नाव, कारवाई करा; शिवसेना आमदाराचे गृहमंत्र्यांना पत्र

Marathi Joke: कोरोना, कुठे फेडशील रे हे पाप??

सिनेसृष्टी हादरली! एकाच दिवसात दुसरी आत्महत्या; अभिनेत्री अनुपमा पाठकने जीवन संपवले

आजचे राशीभविष्य - 7 ऑगस्ट 2020; वृश्चिक राशीचा वस्त्र, दागीने व सौंदर्य प्रसाधनांवर खर्च

सरकारी नोकरी नसली म्हणून काय झाले? पेन्शनसाठी सरकारी योजना आहे ना...

Web Title: Made in India kia sonet unveiled; here is everything you need to know

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.