सुरक्षेच्या दृष्टीनं मेड इन इंडिया Maruti Swift ठरली झीरो; क्रॅश टेस्टमध्ये '0' स्टार रेटिंग
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2021 03:02 PM2021-08-28T15:02:08+5:302021-08-28T15:04:07+5:30
Maruti Swift Car Crash Test : Maruti च्या या कारची करण्यात आली होती क्रॅश टेस्ट. ही कार मेड इन इंडिया असून गुजरातमधील मॅन्युफॅक्चरींग फॅसिलिटीमध्ये तयार करण्यात आली आहे.
लॅटिन न्यू कार असेसमेंट प्रोग्राम (लॅटिन NCPA) नं अलीकडेच त्या ठिकाणी विक्री करण्यात आलेल्या सुझुकी स्विफ्टची (Maruti Suzuki Swift) क्रॅश-टेस्ट केली. सेफ्टी वॉचडॉगकडून कया कारला झिरो रेटिंग देण्यात आलं आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लॅटिन NCAP द्वारे चाचणी केलेली कार मारुती सुझुकी मोटर गुजरात मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटीमध्ये बनवण्यात आली आहे, म्हणजेच ती मेड इन इंडिया कार आहे. कारला अॅडल्ट ऑक्युपंट प्रोटेक्शनसाठी 15.53 टक्के रेटिंग देण्यात आलं आहे, तर चाईल्ड ऑक्युपंट प्रोटेक्शनसाठी 0 टक्के रेटिंग मिळालं आहे.
पादचारींची सुरक्षा आणि असुरक्षित ट्रॅक युझर्ससाठी कारनं 66 टक्के चांगले गुण मिळवले, तरीही सिक्युरिटी असिस्सटंट सिस्टमबाबतीत रेटिंग पुन्हा 7 टक्क्यांनी घसरले. त्याच्या अहवालात, लॅटिन एनसीएपी म्हणणं आहे की 0 स्टार रेटिंग खराब साइड इम्पॅक्ट प्रोटेक्शन आणि चाचणी दरम्यान दरवाजे खुले झाल्यानं देण्यात आलं आहे. कारचा व्हिपलॅश स्कोअर मागील चाचणीसाठी UN32 ची कमतरता, स्टँडर्ड साइड हेड प्रोटेक्शन एअरबॅग्सची कमतरता, स्टँडर्ड ESC ची कमतरता आणि चाचणीसाठी CRS ची शिफारस न करण्याचा सुझुकीचा निर्णय यामुळे होता.
लॅटिन NCAP ने असेही म्हटले आहे की कारचा दरवाजा उघडल्याने UN95 रेग्युलेशन रिक्वायरमेंट पूर्ण होणार नाही. वॉचडॉगने सांगितलं की स्विफ्ट युरोपमध्ये 6 एअरबॅग आणि इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल (ईएससी) सह स्टँडर्ड म्हणून विकली जाते, तर लॅटिन अमेरिकेतील मॉडेल साइड बॉडी आणि हेड एअरबॅग आणि ईएससी स्टँडर्डसह सादर केले जात नाहीत.
बेसिक फीचर्स आवश्यक
"बेसिक व्हेईकल सेफ्टी. जी स्टँडर्ड आहे. एक अधिकार आहे, ज्यासाठी लॅटिन अमेरिकन ग्राहकांनी अधिक पैसे न देता दावा केला पाहिजे. ही एक सिक्युरिटी फीचर आहे, जे दुर्घटनांच्या वेळी एका लसीप्रमाणे काम करतं. ग्राहकांना यासाठी अधिक पैसे न देता ते मिळवण्याचा अधिकार आहे," अशी प्रतिक्रिया लॅटिन NCAP चे जनरल सेक्रेटरी एलेजांद्रो फुरस यांनी दिली.