Mahindra 4 New SUV Launch: महिंद्रा करतेय जोरदार तयारी, बंद केलेल्या एसयुव्हीसह चार कार लाँच होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2023 11:48 AM2023-03-01T11:48:47+5:302023-03-01T11:51:19+5:30

याचसोबत महिंद्रा पॉप्युलर मिडसाईज एसयुव्ही महिंद्रा एक्सयूवी700 चे इलेक्ट्रीक व्हेरिएंटही आणणार आहे.

Mahindra 4 New SUV Launch: Mahindra is gearing up to launch four cars including a discontinued SUV 500 | Mahindra 4 New SUV Launch: महिंद्रा करतेय जोरदार तयारी, बंद केलेल्या एसयुव्हीसह चार कार लाँच होणार

Mahindra 4 New SUV Launch: महिंद्रा करतेय जोरदार तयारी, बंद केलेल्या एसयुव्हीसह चार कार लाँच होणार

googlenewsNext

गेल्या काही वर्षांपासून टाटा आपला जलवा दाखवत आहे. आता महिंद्राने देखील कंबर कसली असून लवकरच चार नव्या एसयुव्ही भारतीय बाजारात आणण्यात येणार आहेत. यामध्ये महिंद्रा थार ५ डोअर सह बोलेरो, एक्सयुव्ही ५०० चे नेक्स्ट जनरेशन मॉडेल असणार आहे. 

याचसोबत महिंद्रा पॉप्युलर मिडसाईज एसयुव्ही महिंद्रा एक्सयूवी700 चे इलेक्ट्रीक व्हेरिएंटही आणणार आहे. याचे सध्याचे नाल XUVE.8 असे ठेवण्यात आले आहे. जर तुम्ही महिंद्राच्या कार विकत घेण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला या येणाऱ्या कारवर लक्ष ठेवावे लागणार आहे. 

Mahindra Thar 5 डोअर व्हर्जन पुढील वर्षी लाँच केले जाऊ शकते. यात स्कॉर्पिओ-एनचे इंजिन असेल. काही कॉस्मेटिक बदलांसोबतच नवीन फीचर्सही यात पाहायला मिळतील. तर Mahindra XUVe.8 ला कंपनी INGLO प्लॅटफॉर्मवर आणणार आहे. ही इलेक्ट्रिक SUV डिसेंबर 2024 मध्ये लॉन्च केली जाऊ शकते. यामध्ये 80kWh पर्यंत बॅटरी असेल, यामुळे रेंजही चांगली मिळणार आहे. ही इलेक्ट्रिक एसयूव्ही ऑल व्हील ड्राइव्ह पर्यायासह सादर केली जाईल.

महिंद्रा XUV700 लाँच झाल्यावर XUV500 बंद केली होती. आता ही एसयुव्ही नव्या ढंगात येत आहे. नवीन जनरेशन XUV500 पुढील वर्षी उत्तम लुक-फीचर्स आणि पॉवरट्रेनसह लॉन्च केली जाऊ शकते. महिंद्रा अँड महिंद्राच्या सर्वाधिक विकल्या जाणार्‍या एसयूव्हींपैकी एक बोलेरो देखील येत्या काळात नव्या रुपात लाँच होऊ शकते. 

Web Title: Mahindra 4 New SUV Launch: Mahindra is gearing up to launch four cars including a discontinued SUV 500

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.