Mahindra आणतेय आणखी एक ठासू Scorpio! मिळेल 7 आणि 9 सीटरचा ऑप्शन, जाणून घ्या फीचर्स

By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2023 01:53 PM2023-03-01T13:53:35+5:302023-03-01T13:56:04+5:30

लवकरच हिचे S5 नावाने आणखी एक नव्हे व्हेरिअँट येत आहे. जे या दोन्हींमध्ये प्लेस केले जाईल. या नव्या व्हेरिअँटचे डिटेल्स लॉन्चपूर्वीच लिक झाले आहे.

Mahindra brings another Scorpio s5 You will get 7 and 9 seater option, know the features | Mahindra आणतेय आणखी एक ठासू Scorpio! मिळेल 7 आणि 9 सीटरचा ऑप्शन, जाणून घ्या फीचर्स

Mahindra आणतेय आणखी एक ठासू Scorpio! मिळेल 7 आणि 9 सीटरचा ऑप्शन, जाणून घ्या फीचर्स

googlenewsNext

महिंद्रासाठी त्यांची स्कॉर्पिओ ही सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या गाड्यांपैकी एक आहे. अनेक वर्ष होऊनही ग्राहकांमध्ये हिची जबरदस्त मागणी आहे. आता स्कॉर्पिओची स्कॉर्पिओ क्लासिक (Scorpio Classic) नावाने विक्री होते. ही SUV सध्या S आणि S11 अशा दोन व्हेरिअंटमध्ये विकली जाते. तसेच, लवकरच हिचे S5 नावाने आणखी एक नव्हे व्हेरिअँट येत आहे. जे या दोन्हींमध्ये प्लेस केले जाईल. या नव्या व्हेरिअँटचे डिटेल्स लॉन्चपूर्वीच लिक झाले आहे.

लीक झालेल्या अप्रूव्हल डॉक्यूमेंटनुसार, S5 आणि S11 ट्रिम्ससाठी बसायचे पर्यायही वाढविण्यात आले आहेत. जेथे बेस-स्पेक S व्हेरिअंटमध्ये केवळ 9-सीटचा पर्याय आहे. S5 आणि S11 व्हेरिअंटमध्ये 7-सीटर आणि 9-सीटर असे दोन्ही पर्याय दिले जातील. आपल्या अपडेटेड फॉरमॅटमध्ये स्कॉर्पिओ क्लासिकचे एकूण सात वेरिअंट असतील. यापूर्वी, केवळ बेस व्हेअट S 9-सीटर पर्यायांतच उपलब्ध होती. 9-सीटर व्हेरिअंटमध्ये दुसऱ्या लाईनमध्ये बेंच सीट आणि मागच्या बाजूला 2×2 साईड फेसिंग बेंच सीट असतील. स्कॉर्पिओ क्लासिकच्या टॉप-स्पेक S11 व्हेरिअँटमध्ये सेकंड-रो कॅप्टन सीटचा पर्याय दिला जाईल.

येथे पाहा फीचर्स लिस्ट -
नव्या S5 व्हेरिअँटमध्ये बॉडी कलर्ड बंपर, स्टील व्हील्स, सेंट्रल लॉकिंग, ऑडियो सिस्टिम आणि इलेक्ट्रिकली अॅडजस्टेबल ORVMs सारखे फीचर्स मिळू शकतात. याशिवाय सेफ्टीसाठी डुअल एअरबॅग्ज, कोलॅप्सिबल स्टिअरिंग, इंजिन इमोबिलायझर, सीट बेल्ट रिमाइंडर आणि स्पीड अलर्ट सारखे फीचर्स असतील.

इंजिन आणि पॉवर -
स्कॉर्पिओ क्लासिकचे नवे S5 व्हेरिअंट आल्याने S आणि S11 व्हिरिअंट मधील किंमतीचे अंतर कमी करण्यास मदत मिळेल. सध्या स्कॉर्पिओ क्लासिकच्या बेस वेरिअंटची किंमत 12.64 लाख रुपये आणि टॉप व्हेरिअंटची किंमत 16.14 लाख रुपये एवढी असेल. 

या दोन्ही व्हेरिअंटच्या किंमतीत 3.5 लाख रुपयांचे अंतर आहे. कारच्या इंजिन परफॉर्मेन्समध्ये कसल्याही प्रकारचा बदल होणार नाही. स्कॉर्पिओ क्लासिक 2.2 लिटर डिझेल इंजिनसह येते. जी जास्तीत जास्त 130 एचपीची पॉवर आणि 300 एनएमचा पीक टॉर्क जेनरेट करते.

Web Title: Mahindra brings another Scorpio s5 You will get 7 and 9 seater option, know the features

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.