Scorpio Classic: महिंद्राच्या 'या' SUVची जबरदस्त विक्री; जुना फोटो शेअर करत आनंद महिंद्रा म्हणाले- 'Old is Gold'

By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2022 01:42 PM2022-10-04T13:42:35+5:302022-10-04T13:43:27+5:30

Mahindra Best Selling SUV: सप्टेंबर महिन्यातील कार विक्रीची आकडेवारी समोर आली आहे. सप्टेंबर महिन्यात कारच्या विक्रीमध्ये तेजी पाहायला मिळाली आहे.

Mahindra Car sales in september | scorpio classic gets highest booking in september Anand Mahindra also surprised | Scorpio Classic: महिंद्राच्या 'या' SUVची जबरदस्त विक्री; जुना फोटो शेअर करत आनंद महिंद्रा म्हणाले- 'Old is Gold'

Scorpio Classic: महिंद्राच्या 'या' SUVची जबरदस्त विक्री; जुना फोटो शेअर करत आनंद महिंद्रा म्हणाले- 'Old is Gold'

googlenewsNext

Mahindra Best Selling SUV: सप्टेंबर महिन्यातील कार विक्रीची आकडेवारी समोर आली आहे. सप्टेंबर महिन्यात कारच्या विक्रीमध्ये तेजी पाहायला मिळाली आहे. इतर कंपन्यांबरोबरच महिंद्रासाठीही सप्टेंबर महिना चांगला गेला. महिंद्रा सप्टेंबर 2022 मध्ये सर्वात मोठी SUV विक्री करणारी कार कंपनी ठरली आहे. 

Mahindra Scorpio-N आणि Mahindra XUV700 सारख्या वाहनांची ग्राहकांची जोरदार मागणी आहे. यातही कंपनीच्या स्कॉर्पिओ क्लासिकचे सर्वाधिक बुकिंग झाले आहे. महिंद्राने गेल्या महिन्यातच आपल्या प्रसिद्ध स्कॉर्पिओ कारचे एक नवीन व्हर्जन(Mahindra Scorpio Classic ) लॉन्च केले आहे. 

महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा देखील नवीन स्कॉर्पिओ क्लासिकचे बुकिंग पाहून चकीत झाले. त्यांनी ट्विटरवर एक जुना फोटो शेअर केला आणि जुन्या आठवणींनाही उजाळा दिला. ट्विटमध्ये त्यांनी 2002 मधील पहिल्या स्कॉर्पिओच्या लॉन्चचा फोटो पोस्ट केला आहे. यासोबत त्यांनी लिहिले, "सप्टेंबर चांगला होता, पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे गेल्या महिन्यात सर्वात जास्त बुकिंग स्कॉर्पिओ क्लासिकसाठी होते. 2002 मध्ये पहिल्या स्कॉर्पिओच्या लॉन्चच्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या. जुने तेच सोने आहे..." 

स्कॉर्पिओ क्लासिकची पॉवर
स्कॉर्पिओ क्लासिकमध्ये 2.2 लिटर सेकंड जनरेशन mHawk डिझेल इंजिन देण्यात आले आहे. हे 132 PS ची कमाल पॉवर आणि 300 Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. महिंद्राचे म्हणणे आहे की, फ्यूल इकॉनमीमध्येही 15% वाढ झाली आहे. यात 6-स्पीड ट्रान्समिशन उपलब्ध आहे. महिंद्रा स्कॉर्पिओ क्लासिकची किंमत रु.11.99 लाख (एक्स-शोरूम) पासून सुरू होते.

Web Title: Mahindra Car sales in september | scorpio classic gets highest booking in september Anand Mahindra also surprised

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.