फक्त 3 लाख रुपयांसह देशातील सर्वात स्वस्त EV बनेल Mahindra Atom! मिळतील जबरदस्त फीचर्स 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2022 12:06 AM2022-04-04T00:06:39+5:302022-04-04T00:09:43+5:30

अ‍ॅटम इलेक्ट्रिक क्वाड्रिसायकल एका चार्जवर 120 किमीपर्यंत चालविता येऊ शकते...

Mahindra introduced new range of electric vehicles Mahindra Atom will become the cheapest EV in the country with just Rs 3 lakh | फक्त 3 लाख रुपयांसह देशातील सर्वात स्वस्त EV बनेल Mahindra Atom! मिळतील जबरदस्त फीचर्स 

फक्त 3 लाख रुपयांसह देशातील सर्वात स्वस्त EV बनेल Mahindra Atom! मिळतील जबरदस्त फीचर्स 

Next

 

नवी दिल्ली - भारतात इलेक्ट्रिक वाहनांची क्रेझ वाढत असून आता कंपन्यांसह ग्राहकांनीही या वाहनांमध्ये रस घेण्यास सुरुवात केली आहे. मोठ्या वाहन निर्मात्यांबरोबरच, लहान आणि मोठे स्टार्टअप देखील आता इलेक्ट्रिक वाहने बाजारात आणत आहेत. महिंद्रा अँड महिंद्रा (Mahindra & Mahinddra) ही भारतातील अग्रगण्य कंपन्यांपैकी एक आहे आणि तिची इलेक्ट्रिक शाखा महिंद्रा ऑटोमोटिव्हने पुण्यात चालू असलेल्या अल्टरनेट फ्युएल कॉन्क्लेव्ह 2022 (Alternate Fuel Conclave 2022) मध्ये इलेक्ट्रिक वाहनांची नवीन रेंज सादर केली आहे.

महिंद्रा इलेक्ट्रिकने ट्रेओ ऑटो, ट्रेओ जोर डिलिव्हरी व्हॅन, ट्रेओ टिपर व्हेरिअंट आणि ई-अल्फा मिनी टिपरसह अ‍ॅटम क्वाड्रिसायकल सादर केली आहे. इलेक्ट्रिक 3-व्हीलर सेगमेंटमध्ये महिंद्राचा बाजारातील हिस्सा 73.4 टक्के आहे, यामुळे कंपनी या यादीत पहिल्या स्थानावर आहे.

महिंद्रा अ‍ॅटम क्वाड्रिसायकल -
इलेक्ट्रिक पॉवरवर चालणारी महिंद्रा अ‍ॅटम क्लीन एनर्जी, आरामदायी आणि स्मार्ट फीचर्ससह सुसज्ज आहे. Atom सोबत, महिंद्राने इलेक्ट्रिक अल्फा टिपरही बाजारात आणले आहे. ते ई-अल्फा मिनी प्लॅटफॉर्मवर आधारित आहे. ई-अल्फा मिनी टिपरला 1.5 kWh बॅटरी पॅक देण्यात आला आहे. याच्या सिंगल चार्जवर 80 किमी पर्यंतची रेंज मिळते. याची लोडिंग क्षमता 310 किलो एवढी आहे. सध्या महिंद्रा अ‍ॅटमला व्यावसायिक वाहन म्हणून लाँच करण्यात आले आहे, ते वैयक्तिक वापरासाठी लॉन्च केले जाईल की नाही, हे अद्याप स्पष्ट नाही.

फक्त 3 लाख असेल किंमत!
महिंद्रा अ‍ॅटम केवळ लुक आणि वैशिष्ट्यांच्या बाबतीतच पैसा वसूल कार नाही, तर तिची किंमतही खूपच कमी असण्याचा  अंदाज वर्तवला जात आहे. आतापासून असा अंदाज बांधणे योग्य ठरणार नाही, परंतु या कारची किंमत सुमारे 3 लाख रुपयांच्या असापास असण्याचा अंदाज आहे. महिंद्रा अ‍ॅटमचा कमाल वेग ताशी 50 किमी एवढा असेल. तिला पूर्णपणे चार्ज होण्यासाठी 5 तास लागतील. अ‍ॅटम इलेक्ट्रिक क्वाड्रिसायकल एका चार्जवर 120 किमीपर्यंत चालविता येऊ शकते. इलेक्ट्रिक ऑटो-रिक्षासाठी हा एक उत्तम पर्याय म्हणूनही समोर येऊ शकतो.

Web Title: Mahindra introduced new range of electric vehicles Mahindra Atom will become the cheapest EV in the country with just Rs 3 lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.