Mahindra नं लॉन्च केली फक्त 5.26 लाखांची गाडी; CNG वर चालणार, 35KM मायलेज देणार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2022 07:23 PM2022-08-08T19:23:18+5:302022-08-08T19:24:43+5:30

Mahindra CNG Truck: कमी किमतीसोबतच या गाडीचे मायलेजही जबरदस्त म्हणजेच 35KM हून अधिक आहे. सध्या कमर्शिअल वाहनांच्या सेगमेंटमध्ये महिंद्रा कंपनी ही टाटा मोटर्सनंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे.

Mahindra launched only rs 5.26 lakh car Will run on CNG and give 35KM mileage | Mahindra नं लॉन्च केली फक्त 5.26 लाखांची गाडी; CNG वर चालणार, 35KM मायलेज देणार

Mahindra नं लॉन्च केली फक्त 5.26 लाखांची गाडी; CNG वर चालणार, 35KM मायलेज देणार

googlenewsNext

महिंद्राने भारतीय बाजारात आपले नवे कमर्शिअल वाहन लॉन्च केले असून त्याला जीतो प्लस CNG 400 (Jeeto Plus CNG 400) नाव देण्यात आले आहे. याची किंमत केवळ 5.26 लाख रुपये (एक्स-शोरूम) एवढी ठेवण्यात आली आहे. एवढेच नाही, तर, या वाहनात आपल्याला सेगमेंटचा सर्वोत्तम पेलोड, रेंज आणि मायलेज मिळेल, असा दावा कंपनीने केला आहे.

विशेष म्हणजे, कमी किमतीसोबतच या गाडीचे मायलेजही जबरदस्त म्हणजेच 35KM हून अधिक आहे. सध्या कमर्शिअल वाहनांच्या सेगमेंटमध्ये महिंद्रा कंपनी ही टाटा मोटर्सनंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. जुलै 2022 मध्ये कंपनी 16,478 युनिट्सची विक्री केली आहे.

महिंद्रा जीतो प्लस सीएनजी शहरात आणि शहरा बाहेरच्या वापरासाठीही अनुकूल आहे. हिला 2 सीएनजी टँक (40L+28L) देण्यात आले आहेत. ते दोन्ही मिळून एकूण 68 लिटर एवढे आहेत. जे या सेगमेंटमध्ये पहिल्यांदाच देण्यात आले आहेत. 

टँक पूर्ण भरलेला असल्यास ही पिकअप 400km हून अधिक चालेल. यामुळेच हिला cng 400 नाव देण्यात आले आहे. ही पिकअप आपल्याला 35.1 किमी प्रति किलोग्रॅमचे मायलेज देईल, असा दावा कंपनीने केला आहे. याशिवाय, या गाडीची पेलोड क्षमतादेखील 650 किलोग्रॅम एवढी आहे. ही गाडी आपल्याला इतर पिकअपच्या तुलनेत 30 टक्के अधिक बचत करून देईल, असा दावादेखील कंपनीने केला आहे.

महिंद्रा जीतो प्लस सीएनजीमध्ये देण्यात आलेले इंजिन 1,600-2,200 आरपीएमवर 15 किलोवॅट पीक पावर आणि 44 एनएम पीक टॉर्क ऑफर करते. ते 3 वर्ष/72,000 किमी वारंटीसोबत देण्यात आले आहे. त्याचा देखभाल खर्च 0.22 रुपये प्रति किमी एवढा आहे.

Web Title: Mahindra launched only rs 5.26 lakh car Will run on CNG and give 35KM mileage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.