Hero-Mahindra Eletric Scooter Launch: महिंद्राची स्वस्त इलेक्ट्रीक स्कूटर लाँच; या मोठ्या कंपनीसोबत सहकार्य, जाणून घ्या रेंज आणि किंमत

By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2022 04:29 PM2022-02-08T16:29:11+5:302022-02-08T16:29:59+5:30

Hero-Mahindra Eletric Scooter Launch: भागीदारी अंतर्गत, दोन्ही कंपन्या एकत्रितपणे इलेक्ट्रिक टू-व्हीलरसाठी पुरवठा साखळी आणि शेअर प्लॅटफॉर्मचे उत्पादन आणि विकास करतील. यानुसार महिंद्रा हिरोच्या ऑप्टिमा आणि एनवायएक्सचे उत्पादन करणार आहे.

Mahindra launches cheap electric scooter hero Optima; Range 82 km, Price 55,580 Rs | Hero-Mahindra Eletric Scooter Launch: महिंद्राची स्वस्त इलेक्ट्रीक स्कूटर लाँच; या मोठ्या कंपनीसोबत सहकार्य, जाणून घ्या रेंज आणि किंमत

Hero-Mahindra Eletric Scooter Launch: महिंद्राची स्वस्त इलेक्ट्रीक स्कूटर लाँच; या मोठ्या कंपनीसोबत सहकार्य, जाणून घ्या रेंज आणि किंमत

Next

महिंद्रा कंपनीने इलेक्ट्रीक वाहनांच्या क्षेत्रातील दिग्गज असलेल्या हिरो इलेक्ट्रीकसोबत सहकार्य करार केला आहे. या नुसार या कंपनीने पहिली इलेक्ट्रीक स्कूटर लाँच केली आहे. या स्कूटरचे नाव ऑप्टिमा असून ही स्कूटर मध्य प्रदेशच्या पीथमपूर येथील प्लांटमध्ये बनविण्यात येत आहे. दोन्ही कंपन्यांनी गेल्या महिन्यात १५० कोटी रुपयांच्या पात वर्षांच्या पार्टनरशीपची घोषणा केली होती. 

महिंद्रा समूहासोबतच्या या भागीदारीच्या मदतीने, हिरो इलेक्ट्रिकचे या वर्षाच्या अखेरीस प्रतिवर्षी 1 दशलक्ष इलेक्ट्रिक वाहनांचे उत्पादन करण्याचे उद्दिष्ट आहे. भागीदारी अंतर्गत, दोन्ही कंपन्या एकत्रितपणे इलेक्ट्रिक टू-व्हीलरसाठी पुरवठा साखळी आणि शेअर प्लॅटफॉर्मचे उत्पादन आणि विकास करतील.
यानुसार महिंद्रा हिरोच्या ऑप्टिमा आणि एनवायएक्सचे उत्पादन करणार आहे. याचबरोबर संयुक्त उद्यम भागीदारी अंतर्गत, दोन्ही कंपन्या महिंद्राच्या मालकीच्या प्यूजिओ मोटरसायकल पोर्टफोलिओच्या इलेक्ट्रीफिकेशनसाठी देखील काम करतील.

हिरो इलेक्ट्रिकने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये नव्या ऑप्टिमाचे अनावरण केले होते. यात क्रूझ कंट्रोल फीचर आहे. ऑप्टिमाचे हे वैशिष्ट्य स्कूटर रायडरला एकसमान वेग देते. रायडर त्याच्या इच्छेनुसार वेग सेट करू शकतो. या वैशिष्ट्यामध्ये, सामान्य वेग सेट केला आहे, रायडर स्वतःसाठी पर्याय निवडू शकतो. त्याच वेळी, स्कूटरचे क्रूझ फंक्शन सक्रिय करण्यासाठी एक क्रूझ कंट्रोल बटण देण्यात आले आहे. जेव्हा ते सक्रिय केले जाते, तेव्हा क्रूझ चिन्ह स्पीडोमीटरमध्ये दर्शविणे सुरू होईल, सुरु झाल्यावर ते अपग्रेड केलेल्या स्पीडोमीटरमध्ये दृश्यमान होईल. ब्रेकिंग किंवा थ्रॉटलद्वारे आपल्याला पाहिजे तेव्हा ते चालू बंद केले जाऊ शकते.

82 किमीची रेंज
ही स्कूटर एका चार्जवर 82 किमीची रेंज देईल. याला BLDC मोटरद्वारे 550 W ची शक्ती मिळेल, पूर्ण चार्ज होण्यासाठी 4-5 तास लागतील. यात फ्रंट ब्रेक ड्रम, रिअर ब्रेक ड्रम मिळेल. हिरो इलेक्ट्रिक ऑप्टिमा एचएक्स (सिंगल बॅटरी) ची दिल्लीतील शोरूममध्ये किंमत रु. 55,580 (एक्स-शोरूम) आहे. ही स्कूटर निळा, राखाडी, लाल, पांढरा अशा चार रंगांमध्ये उपलब्ध करण्यात आली आहे.
 

Web Title: Mahindra launches cheap electric scooter hero Optima; Range 82 km, Price 55,580 Rs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.