नववर्षात Mahindra ची नवी Scorpio लाँच होण्यास सज्ज!; सनरुफ, LED हेटलाइट्स अन् जबरदस्त SUV चा फिल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2021 03:25 PM2021-12-30T15:25:19+5:302021-12-30T15:26:32+5:30
महिंद्रा अँड महिंदा (Mahindra & Mahindra) लवकरच बहुप्रतिक्षीत स्कॉर्पिओ २०२२ (Scorpio 2022) लाँच करण्याच्या तयारीत आहे. गेल्या काही महिन्यांपासून नव्या स्कॉर्पिओची चाचणी देशातील विविध ठिकाणी होत होती.
नवी दिल्ली-
महिंद्रा अँड महिंदा (Mahindra & Mahindra) लवकरच बहुप्रतिक्षीत स्कॉर्पिओ २०२२ (Scorpio 2022) लाँच करण्याच्या तयारीत आहे. गेल्या काही महिन्यांपासून नव्या स्कॉर्पिओची चाचणी देशातील विविध ठिकाणी होत होती. नव्या स्कॉर्पिओमध्ये SUV फिचर्स उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार नव्या स्कॉर्पिओमध्ये रिअर सीट्स या कॅप्टन सीट्स असणार आहेत. त्यामुळे आरामदायी प्रवास करता येणार आहे. अर्थात स्कॉर्पिओच्या टॉप मॉडेलमध्ये या सीट्स उपलब्ध करुन देण्यात येतील अशी दाट शक्यता आहे. तर स्टँडर्ड मॉडेलमध्ये सामान्य सीट्सची व्यवस्था असेल. ताज्या माहितीनुसार न्यू जनरेशन स्कॉर्पिओमध्ये पॅनरॉमिक सनरुफ देखील उपलब्ध करुन दिला जाऊ शकतो. कंपनीनं नव्या स्कॉर्पिओला एकदम SUV अंदाजात बाजारात दाखल करण्याचा इरादा पक्का केला आहे. त्यामुळे ग्राहकांमध्येही नव्या स्कॉर्पिओची उत्सुकता लागून राहिली आहे.
महिंद्राच्या नव्या लोगोसह नवी स्कॉर्पिओ लाँच होणार आहे. नुकतंच महिंद्रा SUV 700 कंपनीच्या नव्या लोगोसह लाँच झाली होती. याच SUV मधील काही प्रिमिअम फिचर्स स्कॉर्पिओमध्येही उपलब्ध करुन दिले जाऊ शकतात असा अंदाज आहे. स्कॉर्पिओ-२०२२ मध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे अॅडव्हान्स ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टमची सुविधा दिली जाणार आहे. याशिवाय १० स्पीकरची ऑडिओ सिस्टम, ९ इंचाचा इन्फोन्टेनमेंट सिस्टम, LED हेडलाइट्स, ६ एअरबॅग्स आणि कनेक्टेड कार सिस्टमसारखे हायटेक फिचर्स दिले जाऊ शकतात. विशेष म्हणजे नव्या स्कॉर्पिओला ३६० डिग्री कॅमेरासारखी सुरक्षा सुविधा उपलब्ध करुन देण्याचा कंपनीचा विचार आहे. त्यामुळे नव्या स्कॉर्पिओची जोरदार चर्चा नव्या वर्षात होणार आहे एवढं नक्की.