महिंद्राने आणखी एक नवीन Scorpio केली लॉन्च; फीचर्ससह मिळतील अपडेटेड सस्पेंशन

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2022 07:31 PM2022-08-12T19:31:08+5:302022-08-12T19:37:12+5:30

Mahindra Scorpio Classic Unveiled : नवीन स्कॉर्पिओ क्लासिकचे डिझाईन अपडेट करण्यात आले आहे. तसेच इंटिरिअरमध्ये बदल पाहायला मिळणार आहेत. यात नवीन फीचर्स आणि अपडेटेड सस्पेंशन देखील मिळेल.

mahindra scorpio classic unveiled | महिंद्राने आणखी एक नवीन Scorpio केली लॉन्च; फीचर्ससह मिळतील अपडेटेड सस्पेंशन

महिंद्राने आणखी एक नवीन Scorpio केली लॉन्च; फीचर्ससह मिळतील अपडेटेड सस्पेंशन

googlenewsNext

नवी दिल्ली : महिंद्राने देशात नवीन स्कॉर्पिओ एनसोबत जुन्या स्कॉर्पिओची विक्री सुरू ठेवण्याची घोषणा केली आहे. मात्र, जुन्या मॉडेलची जागा नवीन महिंद्रा स्कॉर्पिओ क्लासिकने (Mahindra Scorpio Classic) घेतली आहे. महिंद्राने नवीन स्कॉर्पिओ क्लासिक लाँच केली आहे. नवीन स्कॉर्पिओ क्लासिकचे डिझाईन अपडेट करण्यात आले आहे. तसेच इंटिरिअरमध्ये बदल पाहायला मिळणार आहेत. यात नवीन फीचर्स आणि अपडेटेड सस्पेंशन देखील मिळेल.

नवीन महिंद्रा स्कॉर्पिओ क्लासिक दोन ट्रिम्स-क्लासिक एस आणि क्लासिक एस 11 मध्ये ऑफर केली आहे. दोन्ही ट्रिम्स 7 आणि 9-सीट ऑप्शनमध्ये ऑफर केल्या आहेत. नवीन स्कॉर्पिओ क्लासिकला नवीन ग्रिल डिझाइन, फॉक्स स्किड प्लेट आणि महिंद्राचा नवीन 'ट्विन पीक्स' लोगो देण्यात आला आहे. टॉप-स्पेक क्लासिक एस 11 मध्ये 17-इंच ड्युअल-टोन अलॉय मिळतील तर क्लासिक एसला स्टील व्हील मिळतील.

नवीन स्कॉर्पिओ क्लासिकमध्ये 9-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम मिळेल. यात सेंटर कन्सोलमध्ये डार्क वुडन ट्रिम इन्सर्ट आणि डॅशबोर्डवर पियानो ब्लॅक इन्सर्ट देण्यात आला आहे.  याचा गियर लीव्हर नवीन थारमधून घेण्यात आला आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने, नवीन स्कॉर्पिओ क्लासिकमध्ये ड्युअल फ्रंट एअरबॅग्ज, पॅनिक ब्रेक इंडिकेशन, इंजिन इमोबिलायझर, अँटी थेफ्ट वॉर्निंग, सीट बेल्ट रिमाइंडर लॅम्प, स्पीड अलर्ट आणि ड्रायव्हिंग करताना ऑटो डोअर लॉक यांसारखी फीचर्स देण्यात आली आहेत.

इंजिन आणि सस्पेंशन 
नवीन महिंद्र स्कॉर्पिओ क्लासिकमध्ये 2.2-लिटर 4-सिलिंडर mHawk टर्बो डिझेल इंजिन देण्यात आले आहे. जे 3,750rpm वर 130bhp पॉवर आणि 1600-2800rpm वर 300Nm पीक टॉर्क जनरेट करू शकते. यामध्ये 6-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स मिळेल. सस्पेंशनबद्दल बोलायचे झाले तर समोर डबल विश-बोन टाईप, इंडिपेंडंट फ्रंट कॉइल स्प्रिंग आणि मागील बाजूस अँटी-रोल बारसह मल्टी-लिंक कॉइल स्प्रिंग देण्यात आले आहे.

Web Title: mahindra scorpio classic unveiled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.