Hyundai Creta अन् Maruti Grand Vitara ला टक्कर देणार ही SUV! Mahindra नं पहिली झलक दाखवली

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2022 02:34 PM2022-12-23T14:34:16+5:302022-12-23T14:37:21+5:30

महिंद्रा मोटर्स सध्या सी-सेगमेंटसाठी नव्या SUV वर काम करत आहे, ही SUV Hyundai Creta आणि Maruti Grand Vitara सारख्या SUV ला टक्कर देऊ शकते.

Mahindra SUV will compete with Hyundai Creta and Maruti Grand Vitara Mahindra has shown the first glimpse | Hyundai Creta अन् Maruti Grand Vitara ला टक्कर देणार ही SUV! Mahindra नं पहिली झलक दाखवली

प्रतिकात्मक फोटो

googlenewsNext

महिंद्रा मोटर्स सध्या सी-सेगमेंटसाठी नव्या SUV वर काम करत आहे, ही SUV Hyundai Creta आणि Maruti Grand Vitara सारख्या SUV ला टक्कर देऊ शकते. महिंद्रा अँड महिंद्राचे मुख्य डिझाईन अधिकारी प्रताप बोस यांनी आगामी नवीन महिंद्रा एसयूव्हीचा पहिला टीझर देखील जारी केला आहे. या टीझरवरून एसयूव्हीच्या सिल्हूटचा अंदाज बांधला जाऊ शकतो. या कारला मोठे व्हील आर्क, प्रॉमिनंट शोल्डर लाईन, स्ट्रेट रूफलाीन, अपराईट विंडशील्ड आणि हंचबॅक रिअर सेक्शन असेल. ही नवी एसयूव्ही नव्या जनरेशनची XUV500 असू शकते. ही नव्या अवतारात येणार असल्याची पुष्टी कंपनीने या पूर्वीच केली आहे.

सध्या महिंद्राकडे कॉम्पॅक्ट SUV मध्ये कुठलेही मॉडेल नाही. ज्यात ह्युंदाई क्रेटा, मारुती ग्रँड विटारा, किआ सेल्टोस, निसान किक्स, स्कोडा कुशाक, एमजी एस्टर आणि फॉक्सवॅगन टाइगून आहेत. यामुळे आशा आहे, की नव्या पीढीतील XUV500 नव्या रुपात बाजारात येईल. XUV700 लॉन्च होण्यापूर्वीच XUV500 तात्पूरत्या स्वरुपात बंद करण्यात आली असल्याची पुष्टी महिंद्राने केली होती. मात्र, ती भविष्यात परत येईल. यात XUV700 चे W601 प्लॅटफॉर्मचा वापर केला जाऊ शकतो. 

कंपनीच्या प्रोडक्ट लाईनअपमध्ये नव्या Mahindra XUV500 (कोडनेम- S301), XUV300 च्या वर आणि XUV700 च्या खालच्या पोझिशनवर असेल. हिला XUV300 सबकॉम्पॅक्ट SUV पासून घेण्यात आलेले 1.2L टर्बो पेट्रोल आणि 1.5L डिझेल युनिट दिले जाऊ शकते. आशा आहे की, या नव्या एक्सयूव्ही 500 मध्ये मोठे टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टिम, एडीएएस (अॅडव्हॉन्स्ड ड्रायव्हर असिस्टेंस सिस्टिम), प्रीमियम ऑडियो सिस्टिम, इलेक्ट्रिक सनरूफ, मल्टीपल एयरबॅग आणि तसेच इतरही काही अॅडव्हॉन्स्ड फीचर्स देण्यात येतील.

कंपनीने अद्याप नव्या एसयूव्हीचे अनावरण करण्याची तारीख अथवा इतर कोणतीही गोष्टीचा खुलासा केलेला नाही. मात्र, पुढील वर्षाच्या (2023) दुसऱ्या सहामाहीत तिच्या डेब्यूची शक्यता वर्तवली जात आहे. या नव्या महिंद्रा एसयूव्हीची किंमत बेस मॉडेलसाठी 10 लाख रुपयांच्या जवळपास असू शकते. तसेच हिचे टॉप-एंड व्हेरिअंट जवळपास 17 लाख रुपयांपर्यंत जाऊ शकते.

Web Title: Mahindra SUV will compete with Hyundai Creta and Maruti Grand Vitara Mahindra has shown the first glimpse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.