Mahindra Thar नव्या अंदाजात लॉन्च झाली, दोन नवे रंग अन् जबरदस्त लूक; पाहा...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2023 05:47 PM2023-03-13T17:47:21+5:302023-03-13T17:49:38+5:30

महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीनं आपली लोकप्रिय ऑफरोडिंग कार Mahindra Thar चा टू-व्हील ड्राइव्ह मॉडल नुकतंच जानेवारी महिन्यात लॉन्च केलं.

mahindra thar 4x4 variants get two new colours option price features detail | Mahindra Thar नव्या अंदाजात लॉन्च झाली, दोन नवे रंग अन् जबरदस्त लूक; पाहा...

Mahindra Thar नव्या अंदाजात लॉन्च झाली, दोन नवे रंग अन् जबरदस्त लूक; पाहा...

googlenewsNext

नवी दिल्ली-

महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीनं आपली लोकप्रिय ऑफरोडिंग कार Mahindra Thar चा टू-व्हील ड्राइव्ह मॉडल नुकतंच जानेवारी महिन्यात लॉन्च केलं. यात या एसयूव्हीला नव्या ट्रान्समिशनसोबतच दोन नव्या रंगात सादर केलं गेलं होतं. एव्हरेस्ट व्हाइट आणि ब्लेजिंग ब्रॉंझ रंगात कार दिसली होती. आता कंपनीनं हेच दोन रंग फोअर व्हील ड्राइव्ह Mahindra Thar 4x4 मध्येही दिले आहेत. यासह आता फोअर व्हील ड्राइव्ह थार आता एकूण सहा रंगात उपलब्ध झाली आहे. यामध्ये एवरेस्ट व्हाइट, ब्लेजिंग ब्राँझ, एक्वा मरीन, रेड रेज, नेपोली ब्लॅक आणि गॅलेक्सी ग्रे रंगाचा समावेश आहे. हे सर्व रंग RWD व्हेरिअंटमध्येही उपलब्ध असणार आहेत. 

एकूण दोन व्हेरिअंट्स AX(O) आणि LX मध्ये उपलब्ध असलेली महिंद्रा थार, सॉफ्ट आणि हार्ड टॉप अशा दोन्ही बॉडीसह येते. यात लाइफस्टाइल ऑफ-रोडिंग एसयूव्हीच्या टू-व्हील ड्राइव्हची किंमत ९.९९ लाख तर फोअर-व्हील ड्राइव्ह व्हेरिअंटची किंमत १३.५९ लाखांपासून सुरू होते. 

Thar 4x4 मध्ये कंपनीनं दोन वेगवेगळे इंजिन पर्याय दिले आहेत. यात २.० लीटर क्षमतेचं पेट्रोल इंजिन जे 150PS ची पावर आणि 320Nm चं टॉर्क जनरेट करतं. तर डिझेल व्हेरिअंटमध्ये २.२ लीटर डिझेल इंजिन देण्यात आलं आहे. जे 130PS की पावर आणि 300Nm चं टॉर्क जनरेट करतं. दोन्ही इंजिन ६-स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटीक गिअरबॉक्समध्ये उपलब्ध आहेत. 

Web Title: mahindra thar 4x4 variants get two new colours option price features detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.