Mahindra Thar 5 Door ची वाट पहाताय? मग, 3 नवीन फीचर्स मिळू शकतात

By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2024 05:32 PM2024-07-05T17:32:36+5:302024-07-05T17:33:47+5:30

Mahindra Thar 5 Door : पुढच्या महिन्यात ऑगस्टमध्ये Thar 5 Door Armada लाँच होण्याची शक्यता आहे. 

mahindra thar 5 door features new 5 door thar launch expected in august | Mahindra Thar 5 Door ची वाट पहाताय? मग, 3 नवीन फीचर्स मिळू शकतात

Mahindra Thar 5 Door ची वाट पहाताय? मग, 3 नवीन फीचर्स मिळू शकतात

नवी दिल्ली : महिंद्रा थारच्या (Mahindra Thar) 3 Door आल्यानंतर ग्राहक आता कंपनीची Thar 5 Door ची आतुरतेने वाट पाहत आहेत. पुढच्या महिन्यात ऑगस्टमध्ये Thar 5 Door Armada लाँच होण्याची शक्यता आहे. 

Thar 5 Door Armada मध्ये Mahindra XUV700 चे काही प्रीमियम फ्लॅगशिप फीचर्स मिळू शकतात. ऑफिशियल लाँचनंतर महिंद्रा 5 डोअर थारची टक्कर थेट Force Gurkha 5 Door आणि Maruti Suzuki Jimny सोबत असणार आहे. महिंद्रा Thar 5 Door मध्ये कोण-कोणते फिचर्स मिळणार? त्याबद्दल जाणून घेऊया.

नवीन इंफोटेंमेंट सिस्टिम
सध्याच्या 3 डोर थारमध्ये 7 इंचाची टचस्क्रीन देण्यात आली आहे. 5 दरवाजाच्या महिंद्रा थारमध्ये ग्राहकांसाठी 10.25 इंच इंफोटेंमेंट सिस्टमचा समावेश केला जाऊ शकतो. नवीन इंफोटेंमेंट सिस्टिममध्ये वायरलेस एपल कारप्ले-एंड्रॉयड ऑटो, नेविगेशन, AdrenoX कनेक्ट आणि महिंद्रा कनेक्टेड टेक सारख्या फीचर्सचा सपोर्ट मिळू शकतो.

सेफ्टी फिचर
3 दरवाजाच्या महिंद्रा थारमध्ये सध्या स्टँडर्ड दोन एयरबॅग्स मिळतात. मात्र, तरीही Global NCAP क्रॅश टेस्टमध्ये या कारला 4 स्टार एडल्ट आणि चाइल्ड सेफ्टीची रेटिंग मिळाली आहे. नव्या थारसोबत कंपनी सेफ्टीमध्ये आणखी सुधारणा घडवू शकते. नव्या थार स्टँडर्डमध्ये 6 एयरबॅग्स दिल्या जाऊ शकतात. त्या शिवाय गाडीत Level 2 ADAS फीचर्सचा समावेश केला आहे.

क्लायमेट कंट्रोल फिचर 
2019 मध्ये पहिल्यांदा महिंद्राने XUV300 सोबत डुअल झोन क्लायमेट कंट्रोल फिचर दिला होता. त्यानंतर 2024 मध्ये XUV700, XUV400 इलेक्ट्रिक आणि 3X0 सारख्या गाड्यांचा सुद्धा या फिचरमध्ये समावेश केला आहे.
 

Web Title: mahindra thar 5 door features new 5 door thar launch expected in august

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.