Mahindra Thar Electric: १५ ऑगस्टला समोर येणार महिंद्रा थार इलेक्ट्रिक, पाहा काय असेल खास
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2023 05:18 PM2023-08-05T17:18:22+5:302023-08-05T17:18:43+5:30
महिंद्रा अँड महिंद्रानं अचानक थार इलेक्ट्रिकबद्दल माहिती देऊन सर्वांना आश्चर्याचा धक्का दिलाय.
देशातील आघाडीच्या वाहन उत्पादक कंपन्यांपैकी एक असलेल्या महिंद्रा अँड महिंद्रानं अचानक थार इलेक्ट्रिकबद्दल माहिती देऊन सर्वांना आश्चर्याचा धक्का दिलाय. आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरुन कंपनीनं यासंदर्भातील माहिती दिली आहे. कंपनीने खुलासा केलाय की, 15 ऑगस्ट रोजी कंपनी थार एसयूव्हीच्या इलेक्ट्रिक व्हर्जनचा (THAR.e) डेब्यू करणार आहे. दक्षिण आफ्रिकेतील केप टाऊनमध्ये ही कार सर्वांसमोर येईल.
तर टीझरमध्ये त्याचा लूक फ्युचरिस्टिक दिसून येतोय आणि ती एक कॉन्सेप्ट कार असू शकते. त्यामुळे बाजारात येण्यास बराच वेळ लागू शकतो. महिंद्रा त्यांच्या ऑफ-रोड सेगमेंटमध्ये काय बदल करतेय हे पाहावं लागणार आहे. महिंद्रा थारचा रेट्रो लूक हे त्याच्या लोकप्रियतेचंसर्वात मोठे कारण आहे. याशिवाय थार इलेक्ट्रिक किती यशस्वी ठरते हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे.
A legend reborn, with an electric vision. Welcome to the future.
— Mahindra Automotive (@Mahindra_Auto) August 5, 2023
📌Cape Town, South Africa
🗓️15th August, 2023#Futurescape#GoGlobalpic.twitter.com/2ixVvmbOL9
कंपनीच्या ताफ्यात सध्या एक्सयूव्ही 400 ही इलेक्ट्रिक एसयुव्ही आहे. कंपनी BE.05 आणि BE.07 सारख्या नवीन वाहनांवर काम करत आहे. थार इलेक्ट्रिक पूर्णपणे इलेक्ट्रिक प्लॅटफॉर्मवर तयार केली जाईल अशी अपेक्षा आहे आणि त्यात दोन इलेक्ट्रिक मोटर्स (फोर व्हील ड्राइव्ह) पाहायला मिळू शकेल.
महिंद्र थार सध्या 2.2L mHawk डिझेल इंजिनसह येते. हे इंजिन 128 hp ची मॅक्स पॉवर देते. तर दुसरी 2.0 लिटर Mstallian टर्बो पेट्रोल मोटर 150 hp ची पॉवर देते. याशिवाय, आणखी 1.5 लीटर डिझेल इंजिन आहे जे 117hp ची पॉवर देते, जे RWD सेटअपसह येते.