आता नव्या इंजिनसह येतेय Mahindra Thar, लॉन्चपूर्वीच SUV चे डिटेल लीक!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2023 10:50 PM2023-03-27T22:50:18+5:302023-03-27T22:50:40+5:30

मंहिंद्राच्या वाहन पोर्टफोलियोमध्ये एक्सयूव्ही 300, एक्सयूव्ही 700, स्कॉर्पिओ क्लॉसिक, स्कॉर्पिओ-एन, बोलेरो, बोलेरो नियो आणि मराजो एमपीव्ही यांचा समावेश आहे.

Mahindra Thar now comes with a new engine, details of the SUV leaked before the launch | आता नव्या इंजिनसह येतेय Mahindra Thar, लॉन्चपूर्वीच SUV चे डिटेल लीक!

आता नव्या इंजिनसह येतेय Mahindra Thar, लॉन्चपूर्वीच SUV चे डिटेल लीक!

googlenewsNext

देशातील एक आघाडीची वाहन निर्माता कंपनी महिंद्रा अँड महिंद्राने नुकतीच आपल्या प्रसिद्ध ऑफरोडिंग SUV Mahindra Thar चे परवडू शकेल असे टू-व्हील ड्राईव्ह व्हेरिअंट लॉन्च केले आहे. आता आलेल्या वृत्तांनुसार, कंपनी ही एसयूव्ही नव्या रियल ड्रायव्हिंग इमिशन नॉर्म्स (RDE) अथवा BS6 फेज-टूनुसार, नव्या इंजिनसह अपडेट करून बाजारात उतरवण्याची तयारी करत आहे. मात्र ही SUV लॉन्च होण्यापूर्वीच इंटरनेटवर हिचे डिटेल्स लीक झाले आहेत. 

महत्वाचे म्हणजे, येणाऱ्या 1 एप्रिलपासून देशभरात नवे रियल ड्रायव्हिंग इमिशन नॉर्म्स (RDE) लागू कण्याची योजना आहे. यामुळे, वाहन निर्माता कंपन्या आपली वाहने व्हिकल लाइन-अप या नव्या नॉर्म्सनुसार तयार करत आहेत. इंटरनेटवर लीक झालेल्या डॉक्युमेंटनुसार, Mahindra That लवकरच RDE मानदंड आणि E20 इंधन-तयार पेट्रोल आणि डिझेल इंजिनसह अपडेट केले जाईल.

सध्या ही SUV 4x4 व्हेरिअंट 2.2-लिटर डिझेल आणि 2.0-लिटर पेट्रोल इंजिनसह येते. हे दोन्ही इंजिन मॅन्यूअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह येतात. तसेच महिंद्रा थारच्या रियल व्हील ड्राइव्ह (RWD) व्हेरिअँटमध्ये कंपनीने 1.5-लिटर क्षमतेचे डिझेल इंजिन देण्यात आले आहे. ते 117bhp एवढी पॉवर आणि 300Nm टॉर्क जेनरेट करते.

याशिवाय, कंपनी महिंद्रा थर सोबतच आपली इतर वाहनेही इंजिनसह अपडेट करणार असल्याचे बोलले जात आहे. मंहिंद्राच्या वाहन पोर्टफोलियोमध्ये एक्सयूव्ही 300, एक्सयूव्ही 700, स्कॉर्पिओ क्लॉसिक, स्कॉर्पिओ-एन, बोलेरो, बोलेरो नियो आणि मराजो एमपीव्ही यांचा समावेश आहे.

Web Title: Mahindra Thar now comes with a new engine, details of the SUV leaked before the launch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.