बिल गेट्स यांनी चालवली Mahindra Treo इलेक्ट्रिक रिक्षा, आता सचिनसोबत लावणार शर्यत! पाहा Video
By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2023 01:51 PM2023-03-06T13:51:10+5:302023-03-06T13:52:36+5:30
जगभरात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी आता वेगानं वाढत आहे आणि इलेक्ट्रिक मोबिलीटीला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारसोबतच दिग्गज उद्योगपती त्या दिशेनं प्रयत्न करत आहेत.
नवी दिल्ली-
जगभरात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी आता वेगानं वाढत आहे आणि इलेक्ट्रिक मोबिलीटीला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारसोबतच दिग्गज उद्योगपती त्या दिशेनं प्रयत्न करत आहेत. आता जगातील सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत ६ व्या क्रमांकावर असलेले बिल गेट्स यांनी महिंद्रा अँड महिंद्राची पावरफुल इलेक्ट्रिक ऑटो-रिक्षा Mahindra Treo चालवण्याचा आनंद लुटला. याचा एक व्हिडिओ आनंद महिंद्रा यांनी ट्विट केला आहे. सोशल मीडियात हा व्हिडिओ वेगानं व्हायरल होत आहे आणि नेटिझन्स प्रतिक्रिया देखील देत आहेत.
“Chalti ka Naam Bill Gates ki Gaadi” So glad you found the time to check out the Treo @BillGates Now on your next trip’s agenda should be a 3-wheeler EV drag race between you, @sachin_rt and me… pic.twitter.com/v0jNikYyQg
— anand mahindra (@anandmahindra) March 6, 2023
सचिन तेंडुलकरसोबत लावणार शर्यत
"चलती का नाम बिल गेट्स की गाडी...बिल गेट्स यांना महिंद्रा ट्रायो चालवताना पाहून खूप आनंद होत आहे. आता बिल गेट्स यांची पुढची ट्रिप इलेक्ट्रिक थ्री-व्हीलर रेस असली पाहिजे. ही रेस बिल गेट्स, सचिन तेंडुलकर आणि माझ्यात होईल", असं ट्विट आनंद महिंद्रा यांनी केलं आहे. यावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत.
व्हिडिओमध्ये Mahindra Treo चे फिचर्स देखील सांगितले आहेत. व्हिडिओत बिल गेट्स स्वत: ही इलेक्ट्रिक ऑटो-रिक्षा चालवताना दिसतात. तर व्हिडिओला १९५८ साली रिलीज झालेल्या 'चलती का नाम गाडी'चं टायटल साँग देण्यात आलं आहे.