Mahindra vs Jeep Lawsuit: महिंद्रा पुन्हा अडचणीत! डिझाईन चोरल्याचा आरोप, 'ही' गाडी बंद होण्याची शक्यता...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2022 03:22 PM2022-09-25T15:22:09+5:302022-09-25T15:23:21+5:30

Mahindra vs Jeep Lawsuit: महिंद्राच्या थार एसयूव्हीवर अनेकदा डिझाईन चोरल्याचा आरोप झाला आहे. आता महिंद्रा पुन्हा एकदा अडचणीत आली आहे. पण...

Mahindra vs Jeep Lawsuit: Mahindra in trouble again! Accused of stealing design, 'Mahindra Roxor' is likely to be closed... | Mahindra vs Jeep Lawsuit: महिंद्रा पुन्हा अडचणीत! डिझाईन चोरल्याचा आरोप, 'ही' गाडी बंद होण्याची शक्यता...

Mahindra vs Jeep Lawsuit: महिंद्रा पुन्हा अडचणीत! डिझाईन चोरल्याचा आरोप, 'ही' गाडी बंद होण्याची शक्यता...

Next

Mahindra Roxor:महिंद्राच्या थार एसयूव्हीवर अनेकदा डिझाईन चोरल्याचा आरोप झाला आहे. आता महिंद्रा पुन्हा एकदा अडचणीत आली आहे. मात्र, यावेळी या प्रकरणाचा महिंद्रा थारशी संबंध नाही. कंपनीच्या आणखी एका वाहनावर डिझाईन चोरल्याचा आरोप आहे, त्यामुळे महिंद्राला ही एसयूव्ही बंद करावी लागू शकते. कंपनी अमेरिकेत Mahindra Roxor नावाने एक गाडी विकते. ही जुन्या थारवर आधारित आहे. ही कंपनीची ऑफ-रोड एसयूव्ही असून, याचे डिझाइन जीपशी मिळती-जुळती आहे. 2018 मध्ये लॉन्च झाल्यापासून ही गाडी अडचणीत आली आहे.

Fiat Chrysler Automobiles (FCA) अमेरिकेच्या बाजारपेठेत Roxor ची विक्री थांबवण्याचा प्रयत्न करत आहे. महिंद्रा रोक्सोरचे जीपशी साम्य असल्याचे कारण देत, FCA ने 2019 मध्ये महिंद्राविरुद्ध आंतरराष्ट्रीय व्यापार आयोगासमोर दावा दाखल केला. त्यानंतर महिंद्राने 2020 मध्ये पुन्हा रॉक्सरचे डिझाइन बदलले. त्यावेळी कंपनीला जीप आणि रोक्सॉरमध्ये फरक करावा, या अटीवर विक्री सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली होती. 

मात्र आता नव्या निर्णयामुळे महिंद्राची अडचण झाली आहे. खोट्या चाचणीनंतर जुना निर्णय घेण्यात आल्याचे यूएस सर्किट कोर्ट ऑफ अपीलने म्हटले आहे. महिंद्रा हा ज्ञात उल्लंघनकर्ता असल्याने न्यायालयाने कठोर कारवाई करायला हवी होती, असेही न्यायालयाने म्हटले आहे. न्यायालयाचे म्हणणे आहे की दोन वाहनांमध्ये थोडा नाही तर मोठा फरक असावा. आता पूर्वीप्रमाणेच निर्णय आपल्या बाजूने लागेल, अशी महिंद्राला आशा आहे. विशेष म्हणजे, या ऑफ-रोड एसयूव्हीमध्ये 2.5-लिटर इंजिन असल्यामुळे यूएस मार्केटमध्ये त्याला चांगलीच पसंती मिळाली आहे. 

Web Title: Mahindra vs Jeep Lawsuit: Mahindra in trouble again! Accused of stealing design, 'Mahindra Roxor' is likely to be closed...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.