आकर्षक लुक अन् दमदार इंजिन; महिंद्राची बहुप्रतीक्षित XUV 3XO लॉन्च; किंमत फक्त...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2024 08:11 PM2024-04-29T20:11:56+5:302024-04-29T20:12:34+5:30

Mahindra XUV 3XO: महिंद्राने या नवीन सबकॉम्पॅक्ट SUV XUV 3XO चे 9 व्हेरिएंट लॉन्च केले आहेत. जाणून घ्या किंमत आणि फीचर्स...

Mahindra XUV 3XO: Attractive looks and powerful engine; Mahindra Launches Much Awaited XUV 3XO; Price only | आकर्षक लुक अन् दमदार इंजिन; महिंद्राची बहुप्रतीक्षित XUV 3XO लॉन्च; किंमत फक्त...

आकर्षक लुक अन् दमदार इंजिन; महिंद्राची बहुप्रतीक्षित XUV 3XO लॉन्च; किंमत फक्त...

Mahindra XUV 3XO launched in India: देशातील आघाडीची वाहन उत्पादक कंपनी Mahindra & Mahindra ने आपली बहुप्रतिक्षित कॉम्पॅक्ट SUV Mahindra XUV 3XO भारतीय बाजारपेठेत आज(29 एप्रिल 2024) रोजी विक्रीसाठी लॉन्च केली आहे. आकर्षक लुक आणि पॉवरफुल इंजिनने सुसज्ज असलेल्या या SUV ची किंमत फक्त 7.49 लाख रुपये (एक्स-शोरूम) पासून सुरू होते. 

डिझाइन:
कंपनीने या SUV ला स्पोर्टी लूक दिला आहे. पहिल्यांदा पाहिल्यावर तुम्हाला XUV400 इलेक्ट्रिकची आठवण येते. SUVचा समोरील भाग महिंद्राच्या 'BE' लाइन-अपपासून मोठ्या प्रमाणात प्रेरित असल्याचे दिसते. यात नव्यानेच डिझाइन केलेले ड्रॉप-डाउन एलईडी डेटाइम रनिंग लाइट्स, त्रिकोणी इन्सर्टसह नवीन ग्रिल सेक्शन आणि नवीन हेडलॅम्प मिळतात. एसयूव्हीचा मागील भागही पूर्णपणे नवीन पद्धतीने डिझाइन करण्यात आला आहे. यात C-आकाराचा LED टेल लॅम्प आहे.

केबिन आणि फीचर्स:
कंपनीने कारच्या केबिनला प्रीमियम टच दिला आहे. यात नवीन डिझाइन केलेले डॅशबोर्ड, एक मोठी 10.25'' इंफोटेनमेंट सिस्टम आणि सराउंड साउंड स्पीकर मिळतील. तसेच, या SUV मध्ये रिमोट क्लायमेट कंट्रोल फीचरदेखील दिले आहे, जे Adrenox ॲप वरून ऑपरेट होईल. म्हणजेच, तुम्ही तुमच्या स्मार्टफोनवरुनच कारच्या केबिनचे तापमान नियंत्रित करू शकाल. याशिवाय वायरलेस अॅपल कार प्ले/अँड्रॉइड ऑटो, व्हेंटिलेटेड फ्रंट सीट, वायरलेस फोन चार्जर, ऑटोमॅटिक हेडलॅम्प यासारके फीचर्सही मिळतील.

पॉवर आणि परफॉर्मन्स:
पॉवरट्रेनचा विचार केला तर ही SUV 1.2 लीटर टर्बो पेट्रोल आणि 1.5 लीटर डिझेल इंजिनसह बाजारात दाखल झाली आहे. कंपनीचा दावा आहे की ही SUV फक्त 4.5 सेकंदात 0 ते 60 किमी/ताशी वेग घेईल. कंपनीच्या दाव्यानुसार, Mahindra XUV 3XO च्या एंट्री लेव्हल वेरिएंटमध्ये 1.2 लीटर टर्बो पेट्रोल इंजिन आहे, जे 6-स्पीड मॅन्युअल आणि 6-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक ट्रान्समिशनने सुसज्ज आहे. मॅन्युअल वेरिएंट 18.89 किमी/लिटर पर्यंत मायलेज देईल, तर ऑटोमॅटिक व्हेरिएंट 17.96 किमी/लिटर पर्यंत मायलेज देईल. याशिवाय, 1.5 लिटर डिझेल इंजिन 6-स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह जोडलेले आहे. डिझेल मॅन्युअल व्हेरिएंट 20.6 किमी/लीटर पर्यंत मायलेज देईल, तर ऑटोमॅटिक व्हेरिएंट 21.2 किमी/लीटर पर्यंत मायलेज देईल.

सुरक्षा:
सर्व व्हेरिएंटमध्ये 6 एअरबॅग्ज, रिअर डिस्क ब्रेक, ESP आणि ISOFIX चाइल्ड सीट अँकर यांसारखी सुरक्षा वैशिष्ट्ये आहेत. टॉप व्हेरियंटमध्ये इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक, 360-डिग्री कॅमेरा, ब्लाइंड स्पॉट मॉनिटर आणि ऑटो-होल्ड, हिल-स्टार्ट आणि हिल डिसेंट असिस्टसह लेव्हल 2 ADAS आहे.

Mahindra XUV 3XO व्हेरिएंट आणि किंमत:

  1. Mahindra XUV 3XO MX1 ची किंमत 7.49 लाख रुपये आहे.
  2. Mahindra XUV 3XO MX2 Pro MT ची किंमत 8.99 लाख रुपये आहे.
  3. Mahindra XUV 3XO MX2 Pro AT ची किंमत 9.99 लाख रुपये आहे.
  4. Mahindra XUV 3XO MX3 ची किंमत 9.49 लाख रुपये आहे.
  5. Mahindra XUV 3XO AX5 ची किंमत 10.69 लाख रुपये आहे.
  6. Mahindra XUV 3XO AX5L MT ची किंमत 11.99 लाख रुपये आहे.
  7. Mahindra XUV 3XO AX5L AT ची किंमत 13.49 लाख रुपये आहे.
  8. Mahindra XUV 3XO AX7 ची किंमत 12.49 लाख रुपये आहे.
  9. Mahindra XUV 3XO AX7L ची किंमत 13.99 लाख रुपये आहे.
     

Web Title: Mahindra XUV 3XO: Attractive looks and powerful engine; Mahindra Launches Much Awaited XUV 3XO; Price only

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.