महिंद्राने वाट वाकडी केली! टाटा नेक्सॉन ईव्हीला टक्कर देणारी XUV 400 SUV लाँच, किंमत पण...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2023 11:05 AM2023-01-17T11:05:03+5:302023-01-17T11:05:29+5:30

Mahindra XUV400 EV: इलेक्ट्रिक SUV च्या पहिल्या 5,000 बुकिंगसाठी ही प्रास्ताविक किंमत ठेवण्यात आली आहे. लॉन्च केल्याच्या एका वर्षात XUV400 चे 20,000 युनिट्स वितरित करण्यात येणार असल्याचे महिंद्राने म्हटले आहे.

Mahindra XUV 400 EV SUV launched to compete with Tata Nexon EV, price start from 15.99 lakhs | महिंद्राने वाट वाकडी केली! टाटा नेक्सॉन ईव्हीला टक्कर देणारी XUV 400 SUV लाँच, किंमत पण...

महिंद्राने वाट वाकडी केली! टाटा नेक्सॉन ईव्हीला टक्कर देणारी XUV 400 SUV लाँच, किंमत पण...

googlenewsNext

महिंद्रा अँड महिंद्राने अखेर सोमवारी त्यांच्या बहुप्रतिक्षित इलेक्ट्रिक कॉम्पॅक्ट SUV XUV400 ची किंमत जाहीर केली. ही इलेक्ट्रीक कार XUV300 कॉम्पॅक्ट एसयुव्हीवर आधारित आहे. EC आणि EL या दोन प्रकारांत ही कार येणार आहे. 

इलेक्ट्रिक SUV च्या पहिल्या 5,000 बुकिंगसाठी ही प्रास्ताविक किंमत ठेवण्यात आली आहे. लॉन्च केल्याच्या एका वर्षात XUV400 चे 20,000 युनिट्स वितरित करण्यात येणार असल्याचे महिंद्राने म्हटले आहे. Mahindra XUV400 EV ची किंमत रु. 15.99 लाख आणि रु. 18.99 लाख (एक्स-शोरूम) ठेवण्यात आली आहे.

SUV साठी बुकिंग २६ जानेवारीपासून सुरू होईल आणि टप्प्याटप्प्याने संपूर्ण भारतात सुरु केले जाईल. पहिल्या टप्प्यात XUV400 भारतातील 34 शहरांमध्ये उपलब्ध करून दिली जाईल. XUV400 EL ची डिलिव्हरी मार्च 2023 मध्ये आणि XUV400 EC दिवाळीच्या काळात सुरू होईल.

महिंद्रा XUV400 पाच रंगांच्या पर्यायांसह येणार आहे. र्क्टिक ब्लू, एव्हरेस्ट व्हाईट, नेपाळी ब्लॅक, गॅलेक्सी ग्रे आणि इन्फिनिटी ब्लू हे रंग असतील. इलेक्ट्रिक SUV ला 39.4kWh बॅटरी पॅक देण्यात येणार आहे. 150bhp पॉवर आणि 310Nm टॉर्क जनरेट करते. एका चार्जवर 456 किमी अंतर कापू शकते. 8.3 सेकंदात 0 ते 100 किमी प्रतितास वेग मिळवू शकते. 

XUV400 मध्ये 2600mm चा सर्वोत्तम-इन-क्लास व्हीलबेस आणि 378 लीटरची बूट क्षमता असेल. डायमंड-कट हाय-कॉन्ट्रास्ट सरफेस ट्रीटमेंट, डेटाइम रनिंग लाइट्स (डीआरएल), बंपर, साइड सिल्स रूफ, कलर मल्टी-इन्फॉर्मेशन डिस्प्ले, इलेक्ट्रिक सनरूफ आणि सहा एअरबॅग्ज दिल्या जातील. Tata Nexon EV Max, MG ZS EV आणि Hyundai Kona Electric या कारना महिंद्राची एसयुव्ही टक्कर देईल. 

Web Title: Mahindra XUV 400 EV SUV launched to compete with Tata Nexon EV, price start from 15.99 lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.